नवी दिल्ली : टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी सोमवारी टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांना संबोधित भाषणात म्हटले की पुन्हा टाटा मोटर्सला या व्यापाराची प्रमुख कंपनी बनविण्यासाठी योजना तयार करा. गेल्या चार पाच वर्षात या समूहाच्या कंपनीतील बाजारातील भागिदारी कमी होत आहे. हा देश या कंपनीला एक अयस्वी कंपनी म्हणून पाहतो तर मला दुःख होते. ते पुण्यात बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या सुरूवातीला आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम सुमारे पाच वर्षांनंतर आयोजित करण्यात आला होता. त्यांनी सांगितले की, एन चंद्रशेखरन आणि प्रबंध निदेशक गुएंतर बुशचेकच्या नेतृत्त्वात टाटा मोटार्स भविष्यात पुढे वाटचाल करणार आहे. 


टाटा मोटर्सशी संबंधीत आपल्या आठवणींना उजळा देत रतन टाटा म्हणाले, टाटा मोटर्सशी जोडले जाणे हे खूप गर्वाची गोष्ट आहे. नवीन वाहन बनविणे, प्रवासी कार प्रकारात उतरणे असो किंवा नवीन प्रणाली आणणे असे काही नव्हते जे मिळविण्यासाठी आपण आपले सर्वस्व पणाला लावले. गेल्या काही वर्षात कंपनीची बाजारातील भागिदारी कमी झाल्याबद्दल बोलताना ते म्हणाले,  मला दुःख होते की गेल्या चार पाच वर्षात आपण बाजारातील भागिदारी घालवली आहे. आपण एक अशी कंपनी झालो आहेत तिला देश एका अपयशी कंपनी म्हणून पाहत आहे. 
 
टाटा मोटर्सचा एकूण ढोबळ कारभार २०१६-१७ मध्ये ३.६ कोटींना वाढून ४९,१०० कोटी रुपये होते. या दरम्यान, हे नुकसान २४८० कोटी रुपये झाले आहे. हे नुकसान एका वर्षापूर्वी ६२ कोटी रुपये होते.