मुंबई : मागील आठवड्यात 4 दिवस शेअर बाजारात कामकाज झाले. दरम्यान, मार्केटच्या तेजीमुळे टाटा ग्रुपच्या सर्वच शेअर्सने दमदार उसळी घेतली. परंतु या सगळ्यांमध्ये अपवाद ठरला तो TCSचा शेअर! या शेअरला फक्त चारच दिवसात 1.20 लाख कोटींचे नुकसान झाले. या उलट मुकेश अंबानी यांना चार दिवसात 18 हजार कोटींचा फायदा झाला. एकूणच फायद्याचा विचार केला तर मागील आठवड्यात गुंतवणूकदारांना 6 लाक कोटींचा फायदा झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसचे मोठे नुकसान झाले आहे.टीसीएसच्या शेअरमध्ये 350 रुपयांची घसरण नोंदवली गेली. याउलट टाटा ग्रुपच्या इतर शेअर्सने गुंतवणूकदारांची झोळी भरली आहे. सेंसेक्सने 61 हजाराचा टप्पा गाठल्याने जवळपास सर्वच सेक्टर्समधील शेअर्स तेजीत होते.  परंतु टीसीएसच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने मार्केट कॅप 1.2 लाख कोटींनी कमी दिसून आली. 


शेअर बाजारात TATA ग्रुपचा डंका! 1 वर्षात तब्बल 1700 टक्क्यांपर्यंत परतावा


मुंबई : टाटा मोटर्स असो की टीसीएस असो, टाटा स्टील असो की टायटन शेअर बाजारात टाटा ग्रुपच्या शेअर्सची नेहमीच चर्चा दिसून येते. त्याचे कारण म्हणजे टाटा ग्रुपच्या शेअर्सचे शानदार प्रदर्शन होय! टाटा ग्रुपचे शेअर हेवी वेटमध्ये देखील तसेच स्मॉलकॅपमध्ये देखील आहेत. गेल्या वर्षभरात बाजारात तेजीमध्ये टाटा ग्रुपच्या शेअर्सने देखील उसळी घेतली आहे. या शेअर्सने वर्षभरात 1728 टक्क्यांनी रिटर्न दिला आहे. सर्वात जास्त रिटर्न देणाऱ्या शेअर्समध्ये Tata Motors, Tata Steel, Titan Company, Tata Chemicals, Tata Power, Tata Elxsi Limited, Tata Teleservices आणि Nelco च्या शेअर्सचा सामावेश होतो. यामध्ये 100 टक्क्यांहून अधिक म्हणजेच 1728 टक्क्यांनी रिटर्न मिळाला आहे. 


सर्वात जास्त 1728 टक्के रिटर्न
टाटा ग्रुपच्या शेअर्समध्ये सर्वाधिक रिटर्न टाटा टेलिसर्विस (महाराष्ट्र) लिमिटेड सर्वात पुढे आहे. या स्टॉकने वर्षभरात 1728 टक्के रिटर्न दिला आहे. या दरम्यान शेअर्सचा भाव 3 रुपयांनी वाढून 54 रुपयांवर पोहचला आहे. तसेच Tata Elxsi Limited ने 1 वर्षात 335 टक्के रिटर्न दिला आहे. यादरम्यान, शेअरचा भाव 1459 रुपयांनी वाढून 6338 रुपये झाला आहे. 


Tata Motors: 300% रिटर्न
टाटा ग्रुपचा हेवीवेट शेअर टाटा मोटर्सने देखील वर्षभरात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. शेअरने 1 वर्षात 300 टक्के रिटर्न दिला आहे. या दरम्यान शेअरचा भाव 131 रुपयांनी वाढून 530 रुपयांवर पोहचला आहे. 


Nelco Limited: 400% रिटर्न
एका वर्षात या शेअरने साधारण 400 टक्क्यांपर्यंतचा रिटर्न दिला आहे. या दरम्यान शेअरचा भाव 178 रुपयांनी वाढून 895 रुपयांवर पोहचला आहे. विशेष म्हणजे शेअरने वर्षभरात 346 टक्के रिटर्न दिला आहे.


TATA Steel 265 % रिटर्न
टाटा स्टिलने एका वर्षात 265 टक्के रिटर्न दिला आहे. या दरम्यान शेअरचा भाव 375 रुपयांवरून 1372 रुपयांवर पोहचला आहे. टाटा केमिकल्स लिमिटेडने 1 वर्षात 245 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या दरम्यान शेअरचा भाव 318 रुपयांवरून 1096 रुपये झाला आहे.


Tata Power Company: 322% 
टाटा पावरने एका वर्षात 322 टक्के रिटर्न दिला आहे. दरम्यान शेअरचा भाव 54 रुपयांवरून 224 रुपयांवर पोहचला आहे.


Titan Company 107%
टायटन कंपनीने गेल्या वर्षभरात 107 टक्के रिटर्न दिला आहे.  या दरम्यान शेअरचा भाव 1223 रुपयांवरून 2534 रुपयांवर पोहचला