मुंबई : रेशन कार्डला (Ration Card)  आधारसोबत (Aadhaar) लिंक करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 होती. तरी अजून काही लोकांनी आपले आधार कार्ड लिंक केलेलं नाही. केंद्रीय अन्न मंत्रालय (Food Ministry) नुसार लिंकिंग प्रोसेस उशीराने केली, तरी सुद्धा लाभार्थ्यांना रेशन दिलं जाईल. मंत्रालयाने हे स्पष्ट केलं आहे की, कोणत्याही व्यक्तीचे रेशनकार्ड, आधारकार्डशी जोडलेले नसले तरी, त्यांच्या हक्काचे रेशन त्यांना मिळणारच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत 90% लोकांचे रेशनकार्ड, आधारकार्डसोबत लिंक झालेले आहेत. त्यात 80 कोटी लाभार्थी कुटुंबीयांपैकी कोणत्याही एका व्यक्तीचा आधारकार्ड हा रेशनकार्डला लिंक केला आहे.


'वन नेशन-वन राशन कार्ड' योजना
1 जून 2020 पासून, केंद्र सरकारने 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रेशन कार्ड पोर्टीबीलीटी सेवा 'वन नेशन-वन रेशन कार्ड' सुरू करण्यात आली आहे. या मागचा उद्देश होता की, कोरोनाकाळात लॉकडाऊन दरम्यान प्रवासी कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना सवलतीच्या दरात धान्य मिळण्यास अडचण येऊ नये. त्यानंतर या योजनेअंतर्गत प्रवासी कामगार (माइग्रेटेड) लोकांना कमी दरात रेशन मिळाले.


आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड, त्रिपुरा, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब हिमाचल प्रदेश आणि दमण-दीवमध्ये या योजनेची अंमलबजावणी आधीच झाली आहे.


आधारला रेशन कार्ड लिंक करण्याची प्रोसेस-


स्टेप 1: प्रथम युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) च्या अधिकृत वेबसाइटवर जा - uidai.gov.in.
स्टेप 2: 'स्टार्ट नाउ' पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3: आपला पत्ता तपशील भरा - जिल्हा आणि राज्य टाका
स्टेप 4: उपलब्ध पर्यायांमधून 'राशन कार्ड' लाभ (Ration Card बेनिफिट) पर्याय निवडा.
स्टेप 5: 'रेशन कार्ड' योजना निवडा.
स्टेप 6: आपला रेशन कार्ड नंबर, आधार क्रमांक, ई-मेल एड्रेस आणि मोबाईल नंबर टाका.
स्टेप 7: तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल पर वन-टाइम पासवर्ड (OTP) येईल. तो OTP भरा. त्यानंतर स्क्रीन पर प्रोसेस झाल्यावर एक नोटिफिकेशन येईल.
स्टेप 8: त्याला ok करा, तुमचं ऍप्लीकेशन वेरिफाइड होईल आणि त्यानंतर तुमचा रेशन कार्ड हा आधारकार्डसोबत लिंक होईल.