Ration Card धारकांसाठी मोठी बातमी; सरकारने जारी केली `ही` यादी, तपासा तुमचे नाव
Free Ration Latest Update : तुम्हालाही स्वस्त रेशनचा लाभ घ्यायचा असेल, तर सरकारने नवी यादी जारी केली आहे. त्यामुळे तुमचे नाव यादीत आहे की नाही हे तुम्ही लगेच तपासून पाहा...
Ration Card List 2022 : रेशनकार्ड हे सरकारने नागरिकांना दिलेले महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हा दस्तऐवज केवळ गरिबांना अनुदानित रेशन (Ration Card) देत नाही तर ओळखीसाठी देखील वापरला जातो. नागरिकत्वाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा यासाठीही याचा वापर केला जातो.
याचदरम्यान सरकारने नवीन यादी जाहीर केली असून नागरिकांना आता स्वस्त रेशनचा लाभ घेता येणार आहे. जर तुमचे नाव यादीत असेल तर तुम्हाला मोफत रेशनसह अनेक विशेष सुविधा मिळू शकतात. त्यामुळे तुमचे नाव यादीत आहे की नाही हे तुम्ही लगेच तपासून पाहा.
सरकारने जाहीर केली यादी
तुम्ही देखील रेशन कार्ड धारक असाल आणि तुम्ही रेशन कार्डसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही यादीत तुमचे नाव तपासावे. रेशन कार्ड धारकांची यादी (रेशन कार्ड 2022 यादी) सरकारद्वारे जारी केली आहे. ज्यामध्ये अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची नावे दिली जात आहेत.
वाचा : Indian Railways : आता ट्रेनमध्ये मोफत जेवण मिळणार, जाणून घ्या कसं?
तुमचे नाव कसे तपासायचे
जर तुमचे नाव या यादीत असेल तरच तुम्ही सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत सुविधांसाठी पात्र होऊ शकता. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून यादी तपासू शकता. यादीतील नाव कसे तपासायचे हे जाणून घ्या.
1. तुम्हाला Nfsa.Gov.In च्या या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
2. वरील मेनूमधील Ration Card पर्यायावर जावे लागेल. यानंतरRation Card Details on State Portals हा पर्याय निवडा.
3. तुम्हाला स्क्रीनवर सर्व राज्यांची नावे दिसतील. तुम्ही ज्या राज्यातून आहात त्या राज्याचे नाव शोधा. तुमच्या राज्याचे नाव मिळाल्यानंतर ते निवडा.
4. त्यानंतर त्या राज्याचे State Food Portal उघडेल. येथे त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांचे नाव स्क्रीनवर दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव शोधून ते निवडायचे आहे.
5. यानंतर तुम्हाला त्या अंतर्गत येणारी ब्लॉक यादी स्क्रीनवर दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या ब्लॉकचे नाव सर्च करून सिलेक्ट करावे लागेल.
6. आता सर्व ग्रामपंचायतींची यादी स्क्रीनवर दिसेल. रेशन कार्डच्या नवीन यादीत कोणाचे नाव आले आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या पंचायतीचे नाव शोधून ते निवडावे लागेल.
7. ग्रामपंचायतीचे नाव निवडल्यानंतर रेशन दुकानदाराचे नाव आणि रेशनकार्डचा प्रकार दिसेल.
8. नवीन यादीमध्ये तुम्हाला तुमच्या नावावर करायचे असलेले रेशन कार्ड निवडा.
९. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत निवडलेल्या रेशन कार्डची संपूर्ण यादी स्क्रीनसमोर दिसेल.
10. आता Ration Card ID, रेशन कार्ड धारकाचे नाव, वडील/पतीचे नाव दिसेल.
आता रेशनकार्डच्या नवीन यादीत कोणाचे नाव दिसत आहे ते येथे तुम्ही तपासू शकता.
दरम्यान रेशनकार्डच्या तपशीलासह घरातील सदस्यांचे तपशील पाहू शकता. यामध्ये तुमच्या कुटुंबातील किती लोकांचा या यादीत समावेश आहे आणि कोणत्या लोकांना मोफत रेशनसारख्या सुविधांचा लाभ मिळू शकेल हे तुम्हाला दिसेल.