Indian Railways : आता ट्रेनमध्ये मोफत जेवण मिळणार, जाणून घ्या कसं?

Indian Railways free meal policy: तुम्हाला माहीत आहे का, आता रेल्वेकडून (railway) तुम्हाला ट्रेनमध्ये (train) मोफत जेवण मिळणार आहे.  यासाठी तुम्हाला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. ही सुविधा तुम्हाला कशी उपलब्ध होणार आहे, याबाबत सविस्तर बातमी जाणून घ्या... 

Updated: Sep 11, 2022, 10:57 AM IST
Indian Railways : आता ट्रेनमध्ये मोफत जेवण मिळणार, जाणून घ्या कसं?  title=

Indian Railway News  :  रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. तुम्ही आता ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला मोफत जेवण मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला जेवणासाठी पैसे देखील द्यावे लागणार नाहीत. रेल्वेकडून (Indian Railway) प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. परंतु अनेक वेळा आपल्याला त्या सुविधांची माहिती नसल्याने त्याचा लाभ घेता येत नाही. चला तर मग जाणून घेऊया या सुविधेबद्दल... (irctc free food facility in indian railway update)

बर्‍याच लोकांना माहित आहे की फ्लाइट विलंब झाल्यास संबंधित एअरलाइन्स प्रवाशांसाठी काही सुविधा देतात. त्याचप्रमाणे गाड्यांना उशीर झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ट्रेनला (Indian Railway) उशीर होत असल्यास, IRCTC तुम्हाला काही मोफत सेवा पुरवरणार आहे. 

ही सुविधा कोणासाठी?

ट्रेनला उशीर झाल्यास, प्रवासी IRCTC च्या नियमांनुसार मोफत जेवू शकतात. जेवणाच्या धोरणानुसार, गाडी दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त उशीर झाल्यास शताब्दी, राजधानी आणि दुरांतो एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. 

तुमच्या ट्रेनला उशीर झाल्यास, IRCTC तुम्हाला अन्न आणि थंड पेय पुरवेल. हे जेवण तुम्हाला IRCTC कडून पूर्णपणे मोफत पुरवले जाते. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जेव्हा गाड्यांना उशीर होतो, तेव्हा प्रवाशांना IRCTC च्या खानपान धोरणानुसार नाश्ता आणि हलके जेवण दिले जाते. तो तुमचा हक्क आहे.

वाचा : सोने खरेदी करायला जाताय, जाणून घ्या आजचे नवे दर

ही सुविधा कधी उपलब्ध होणार?

आयआरसीटीसीच्या (IRCTC) नियमांनुसार प्रवाशांना फ्री (Free) माईलची सुविधा दिली जाते. जेव्हा तुमची ट्रेन 2 तास किंवा त्याहून अधिक उशिरा असते. एक्स्प्रेस (express) ट्रेनमधील प्रवाशांना ही सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच शताब्दी, राजधानी आणि दुरांतो या एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

'या' सुविधा पुरविल्या जातात

न्याहारी चहा किंवा कॉफी आणि बिस्किटे,

चहा किंवा कॉफी आणि ब्रेडचे चार स्लाइस

संध्याकाळचा नाश्ता म्हणून एक पाव बटर

पॉलिसीनुसार IRCTC प्रवाशांसाठी जेवणही पुरवते.