मुंबई : रेशन कार्डावर (Ration Card) स्वस्तात सर्वसामांन्यांना अन्नधान्य दिलं जातं. मात्र त्यासाठी रेशन कार्ड असणं बंधनकारक असतं. रेशन कार्ड बनवण्यासाठी सरकारी कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागतात. कागदपत्र, अधिकाऱ्यांकडून अर्जदाराच्या घराची केलेली पडताळणी, यासारख्या किचकट आणि वेळखाऊ प्रक्रियेतून अर्जदाराला जावं लागतं. परिणामी रेशन कार्डसाठी अर्जदाराला ठराविक काही दिवस प्रतिक्षा करावी लागते. शासनाकडून रेशन कार्ड ऑनलाईन प्रक्रियेनेही मिळवता येतं. मात्र हे वाटतं तितकं सोपं नाही. ही पद्धत वाटते तितकी सोपी नाही. परिणामी सर्वसामांन्यांना दलालांची मदत घ्यावी लागते. मात्र या सर्व कटकटीतून आता सुटका होणार आहे. आता एका दिवसात रेशन कार्ड मिळणार आहे. (ration card news now get ration card in 1 days uttarakhand government give big decision know details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जदारांना 24 तासांत रेशन कार्ड मिळेल. रेशन कार्डसाठी अर्ज तसेच आवश्यक कागदपत्र बंधनकारक असणार आहे. सर्वसामांन्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. उत्तराखंड सरकारने हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामांन्यांचा बहुमूल्य वेळ वाचेल.


अर्जासह आवश्यक कागदपत्र दिल्यानंतर अवघ्या काही तासात पडताळणीनंतर रेशन कार्ड दिलं जाईल. आवश्यक कागदपत्रात कमी असेल तर त्यावर उपाय शोधून दुसऱ्या दिवशी कार्ड बनवून दिलं जाईल. यानंतर रास्त भाव दुकानात मिळणाऱ्या शिधाचा लाभ घेता येईल. 


लांबलचक रांगांमुळे संपूर्ण प्रणाली ही ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे.  मात्र सर्वसामांन्यामध्ये ऑनलाईन प्रक्रियेबाबत तितकीशी जागरुकता नाही किंवा माहितीचा अभाव आहे. त्यामुळे ऑनलाईन रेशन कार्ड बनवणाऱ्यांची संख्या ही फार नगण्य आहे.