Ration Card : मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारचा नवा आदेश
यूआयडीएआय आधार कार्ड वाटप करण्याचं काम करतं. देशात कुठेही आधारद्वारे रेशन घेऊ शकता, अशी माहिती यूआयडीएआयने दिली आहे.
Free Ration : रेशन कार्डधारकांसाठी गूड न्यूज आहे. देशभरात केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकारकडून (State Government) मोफत रेशन दिलं जात आहे. आता या मोफत रेशन घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी यूआयडीएआयने (UIDAI) महत्त्वाची अपडेट दिली आहे. सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचा परिमाण देशातील असंख्य लाभाऱ्थ्यांवर होणार आहे. नक्की काय नियम बदललेत, हे आपण जाणून घेऊयात. (ration card news uidai saus now card holder get ration thorigh aadhar card)
आधारद्वारे रेशन
यूआयडीएआय आधार कार्ड वाटप करण्याचं काम करतं. देशात कुठेही आधारद्वारे रेशन घेऊ शकता, अशी माहिती यूआयडीएआयने दिली आहे. यूआयडीएआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
आता देशात कुठेही रेशन सुविधा आधारद्वारे उपलब्ध होणार आहे. मात्र या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचं आधार अपडेट असायला हवं. त्यामुळे या सुविधेचा लाभ हा अपडेट नसलेल्या आधार कार्ड यूझर्सना घेता येणार नाही. तसेच या व्यतिरिक्त रेशन कार्ड संदर्भात तक्रार असेल, तर1947 या क्रमांकावर संपर्क करु शकता.
सरकारने अंत्योदय रेशन कार्डधारकांना (Anyodya Ration Card Holders) 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतलाय. तर इतर कार्डधारकांना 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ मिळणार आहे.