Ration Card Rules : जर तुम्ही विवाहित असाल तर रेशन कार्डात हे बदल तात्काळ करा, नाहीतर मोठे नुकसान
Ration Card Rules : तुम्ही जर रेशनकार्डधारक असाल आणि विवाहित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. शिधापत्रिकेत नवीन सदस्याचे नाव घालण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.
मुंबई : Ration Card Rules : तुम्ही जर रेशनकार्डधारक असाल आणि विवाहित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. रेशनकार्डमधील कुटुंबाच्या अपडेटबाबत तुम्हाला माहिती हवी. दरम्यान, कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे शिधापत्रिकेवर नोंदवली जातात. परंतु जर तुमचे लग्न झाले असेल किंवा कुटुंबात नवीन सदस्य आला असेल तर तुम्ही त्या सदस्याचे नाव देखील शिधापत्रिकेत जोडले पाहिजे. असे न केल्यास नुकसान सहन करावे लागेल. शिधापत्रिकेत नवीन सदस्याचे नाव घालण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.
नवीन सदस्य नाव कसे जोडायचे?
- तुम्ही विवाहित असाल तर सर्वप्रथम आधार कार्ड अपडेट करा. यासाठी महिला सदस्याच्या आधार कार्डमध्ये वडिलांऐवजी पतीचे नाव लिहावे लागेल.
- जर कुटुंबात मूल जन्माला आले तर त्याचे नाव जोडण्यासाठी वडिलांचे नाव आवश्यक आहे.
- यासोबतच पत्ताही बदलावा लागेल.
- आधार अपडेट झाल्यानंतर, सुधारित आधार कार्डाच्या प्रतीसह, रेशन कार्डमध्ये नाव जोडण्यासाठी अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला अर्ज द्यावा लागेल.
तुम्ही ऑनलाइन देखील अर्ज करु शकता
- वर नमूद केलेल्या आधार कार्डची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, अन्न पुरवठा कार्यालयात जा आणि अर्ज सबमिट करा.
- तुम्ही घरी बसूनही नवीन सदस्यांची नावे जोडण्यासाठी अर्ज करु शकता. यासाठी तुम्ही प्रथम तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- जर तुमच्या राज्यात सदस्यांची नावे ऑनलाइन जोडण्याची सुविधा असेल तर तुम्ही हे काम घरी बसून करु शकता.
- दरम्यान, अनेक राज्यांनी पोर्टलवर ही सुविधा दिली आहे, तर अनेक राज्यांमध्ये ही सुविधा सुरु झालेली नाही.
मुलांचे नाव जोडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- रेशनकार्डमध्ये मुलाचे नाव टाकायचे असेल तर आधी त्याचे आधार कार्ड काढावे लागेल.
- यासाठी तुम्हाला मुलाचे जन्म प्रमाणपत्र देखील आवश्यक असेल.
- यानंतर, आधार कार्डसह, तुम्ही रेशन कार्डमध्ये मुलाचे नाव नोंदवण्यासाठी अर्ज करु शकता.