मुंबई : भारतीय रेल्वे ट्रेन्स म्हटलं तर उशीर आलाचं, क्वचितचं या ट्रेन वेळेत पोहोचत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. एक लांब पल्ल्याची  ट्रेन 
वेळेत पोहोचली.या आनंदात प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर उतरत चक्क गरबा डान्सचं केला आहे. हे तर काहीच नाही या गरब्याला खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रोत्साहीत करणार ट्विट केला आहे. या गरब्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून, याची एकचं चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 हरिद्वार सुपरफास्ट एक्स्प्रेस (२२९१७) ही ट्रेन मध्य प्रदेशातील रतलाम रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर पोहोचली होती. रतलामला पोहोचण्यासाठी ट्रेनचा नियोजित वेळ 10.35 होता. मात्र ही ट्रेन 20 आधीच रतलामला पोहोचली. त्यामुळे वेळेत पोहोचण्याच्या आनंदात असलेल्या प्रवाशांनी डब्यात बसण्याऐवजी प्लॅटफॉर्मवर उतरत चक्क गरबा डान्सचं केला. या गरबा नृत्याचा व्हिडिओ खुद्द रेल्वेमंत्र्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 



 रेल्वेमंत्री काय म्हणाले ? 
या गरबा डान्सचा व्हिडिओ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये काही प्रवासी प्लॅटफॉर्मवर गुजराती डान्स करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत रेल्वेमंत्र्यांनी 'मजामा' आणि हॅपी जरनी असे कॅप्शन लिहिले आहे. अशाप्रकारे त्यांनी प्रवाशांच्या या डान्सला प्रोत्साहीत केले.