नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ला मैदानावर रावण दहनाच्या कार्यक्रमासाठी पोहोचणार होते. पण झाल असं की मोदी पोहोचायच्या आतच रावण धारातीर्थ पडला आहे. त्यामूळे मोदींची भीती एवढी की रावणही घाबरला अशा चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. 


दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर देशभरात रावणाच्या प्रतिकृतीचे दहन केले जाते. दिल्लीतील लाल किल्ला मैदानावरही डोळे विस्फारणा उत्सव दरवर्षी होत असतो. यंदाही त्याची जोरदार तयारी सुरू झाली होती. या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पण ते उत्सवाच्या ठिकाणी पोहोचण्याच्या काही तास आधीच तिथला रावण पडला होता अशा बातम्या आल्या आहेत. जोराचा वारा आल्याने हा रावण पडल्याचे सांगितले जात आहे.
जोरदार वाऱ्यामुळे ८० ते ९० फूट उंचीचे पुतळा पडल्याचे कार्यक्रमाचे संयोजक आणि श्री धार्मिक लीला कमिटीचे प्रेस सचिव रवी जैन म्हणाले पंतप्रधान येणार म्हणून सगळीकडे जय्यत तयारी सुरू होती. सर्वजण त्याच गडबडीत होते. दरम्यान जोराचा वारा आला आणि हा पुतळा पडल्याचे त्यांनी सांगितले. ही घटना किरकोळ असल्याचेही ते म्हणाले. पण ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जैन यांच्या दाव्याशी असहमती व्यक्त केली. पुतळ्याजवळ उभे असलेले दोन लोक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. श्री धार्मिक लीला समिती ही रामलीला महोत्सवाचे आयोजन करणाऱ्यांपैकी सर्वात जुनी संस्था आहे.