COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : दिल्लीतला रावण दहन सोहळा आपल्यासाठी काही नवीन विषय नसला तरी १९५६ साली रावण दहन सोहळा कसा असेल, हे तुम्ही पाहिलं नसेल, तर नक्की पाहा, हा व्हिडीओ ब्रिटीश पाथचा आहे.


नवी दिल्लीत आजही जी मंडळी सत्तेत असते, त्यांना या कार्यक्रमात विशेष महत्व असतं, त्यावेळी देखील पंडित नेहरू हे आपल्या गाडीने रावण दहन सोहळ्याला निघाले असल्याचं दिसून येतं.


मुंबईत रावण दहन सोहळ्याला लगबग नसते, पण दिल्लीत मात्र हा सोहळा विशेष असतो. तेव्हा देखील रावण दहन सोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी दिसून येते.