नवी दिल्ली : गँगस्टर रवी पुजारीचं भारतात लवकरच प्रत्यार्पण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारताचं परराष्ट्र मंत्रालय सेनेगल सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. त्याला भारतात आणण्यासाठी विशेष विमान पाठवण्यात आल्याचंही बोललं जातं आहे. पुजारीला आफ्रिकेतील सेनेगल इथून अटक करण्यात आली आहे. इंटरपोलनं डीआयसीच्या मतदीनं ही कारवाई केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या कित्येक वर्षापासून मुंबई पोलीस रवी पुजारीच्या शोधात होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार रवी पुजारी सेनेगलच्या बुरकीना फासो परिसराकडे जात असताना, डरार इथे सेनेगल पोलिसांनी त्याला अटक केली.


सध्या त्याला सेनेगलच्या रेब्युस कारागृहात ठेवण्यात आलं आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी सेनेगलसोबत चर्चा सुरु आहे. रवी पुजारीला न्यायालयात हजर केलं असता, त्याच्या जीवाला धोका असून भारतात त्याला फाशीची शिक्षा होण्याची भीती त्याच्या वकिलांनी व्यक्त केली.


पुजारीला सेनेगल मध्येच ठेऊन अंतरिम जामिनाची देखील वकिलांनी मागणी केली. तब्बल १५ वर्षांनी रवी पुजारी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. रवी पुजारीनं दाऊद इब्राईमसोबतही काम केलं होतं. दोन दशकांपूर्वी त्यानं स्वताचा वेगळा गट तयार केला. पुजारीवर अनेक देशांमध्ये खंडणी तसेच हत्येचे गुन्हे दाखल आहेत. अँथनी फर्नांडिस या नावाच्या पारपत्रानं तो प्रवास करत होता.