नवी दिल्ली : बँकांच्या निष्काळजीपणावर आता आरबीआयने कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. RBI ची आता यावर नजर आहे. KYC मध्ये निष्काळजीपणा केल्यास बँकावर कारवाई होणार आहे. आरबीआयने यूनियन बँकेवर 2 कोटींना दंड लावला आहे. याआधी स्टेट बँक ऑफ त्रावंकोरवर देखील १ कोटींचा दंड लावण्यात आला होता.


आरबीआयच्या मते, यूनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यांमधून मोठ्या प्रमाणात पैसे काढल्याची तक्रार मिळाली होती. यानंतर केन्द्रीय बँकांनी कडक कारवाई करत 26 जुलैला यूनियन बँक ऑफ इंडियावर २ कोटींचा दंड लावला. भारतीय रिजर्व बँकेने यूनियन बँकेला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. त्यानंतर बँकेवर अयोग्य असं उत्तर मिळाल्याने २ कोटीचा दंड लावण्यात आला.