तुमचं बँक खातं सुरक्षित आहे ना? RBI च्या एका इशाऱ्यानं अनेकांनाच खडबडून जाग
RBI Alert: आरबीआयनं पुन्हा दिलाय इशारा. कोणकोणत्या बँका धोक्यात? यामध्ये तुमच्याही खात्याचा समावेश? पाहा तुमचं खातं सुरक्षित आहे का...
Cyber Risk on Banks: भारतीय रिझर्व्ह बँकेनं गेल्या काही काळापासून कारवाईची भूमिका घेत अनेक लहानमोठ्या बँकांना दणका दिला आहे. आरबीआयनं आखून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेक बँकांचे व्यवहार या कारवाईअंतर्गत बंदही ठेवण्यात आले आहेत. याच आरबीआयनं आता देशातील बहुतांश बँकांना महत्त्वाचा इशारा देत परिस्थिती कोणत्याही क्षणी बिघडू शकते अशा शब्दांत इशारा दिला आहे.
वाढते सायबर हल्ले पाहता आरबीायनं देशातील कैक बँकांना सतर्क केलं आहे. येत्या दिवसांमध्ये देशातील बऱ्याच बँकांवर सायबर हल्ले वाढणार असल्याची दाट शक्यता आरबीआयनं वर्तवल्यामुळं आता अनेक बँक व्यवस्थापनांना खडबडून जाग आली आहे. भविष्यातील संकटाची चाहूल लागल्यामुळं आरबीआयनं देशांतर्गत बँकांना त्यांच्या Cyber Security तत्वांमधील तरतुदी आणखी कठोर करत तातडीनं काही बदल करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. त्यामुळं बँकांकडून अशा आशयाचा अधिकृत इशारा मिळाल्यास खातेदारांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेसुद्धा वाचा : बसपासह 'या' पक्षांना एकही पैसा मिळाला नाही; Electoral Bond संदर्भात नवा गौप्यस्फोट
एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहाच्या माहितीनुसार आरबीआयच्या वतीनं देशातील मोठ्या आणि अनेकांचीच खाती असणाऱ्या बँकांना सतर्क राहत त्यांच्या संकेतस्थळांवर सायबर हल्ला होण्याचा थेट इशारा दिला. इतकंच नव्हे, तर सुरक्षेच्या निकषांचं पालन करत ते आणखी कठोर करण्याचा इशारासुद्धा आरबीआयनं दिला. सायबर सुरक्षा नेमकी कुठं वाढवण्यात यावी, याबाबतही आरबीआयनं मार्गदर्शन केलं.
आरबीआयकडून दरवर्षी यासम धोक्याशी दोन हात करण्यासाठी संकेतस्थळांचं समीक्षण करण्यात येतं. बँकेकडून सायबर सिक्योरिटी एंड इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी एक्जामिनेशन करण्य़ात येतं. सीसाईट म्हणून या प्रक्रियेला संबोधण्यात येतं. यामध्ये नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग अशा स्तरावर समीक्षण केलं जातं.
मागील काही वर्षांमध्ये डिजिटल बँकिंगला मिळालेला वाव पाहता, सायबर हल्ल्यांचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्यामुळं संभाव्य धोक्याची सूचना मिळताच आरबीआय वेळोवेळी देशातील बँकांना सतर्क करण्याचं काम करते.