Bank Holidays: सप्टेंबर महिन्यात 13 दिवस बँका असणार बंद, सुट्ट्यांची यादी पाहून कामं करा
पुढच्या महिन्यातील 30 दिवसांपैकी 13 दिवस बँका बंद असणार आहेत.
Bank Holidays in September 2022: ऑगस्ट महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यात या महिन्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजे 31 ऑगस्टला लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घ्या. कारण पुढच्या महिन्यातील 30 दिवसांपैकी 13 दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे बँकेत काही महत्त्वाची कामं असल्यास तातडीने मार्गी लावा. चेक क्लिअरन्स, कर्ज, डिमांड ड्राफ्ट यासारख्या सेवांसाठी शाखेला भेट द्यावी लागते. सप्टेंबर महिन्यात बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी एकदा बघून घ्या.
आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटनुसार, सप्टेंबर महिन्यात त्या त्या राज्यानुसार बँका बंद असणार आहेत. देशाच्या विविध भागात सण साजरे केले जातात. त्यानुसार सुट्ट्या जाहीर केल्या जातात. सप्टेंबरमध्ये संपूर्ण देशात 6 दिवस आहेत.
देशभरातील बँका 6 दिवस बंद
4 सप्टेंबर रोजी (पहिला रविवार)
10 सप्टेंबर रोजी (दुसरा शनिवार)
11 सप्टेंबर रोजी (दुसरा रविवार)
28 सप्टेंबर रोजी (तिसरा रविवार)
24 सप्टेंबर रोजी (चौथा शनिवार)
25 सप्टेंबर रोजी (चौथा रविवार)
सप्टेंबर 2022 मध्ये बँक सुट्ट्या
1 सप्टेंबर 2022- गणेश चतुर्थी
4 सप्टेंबर 2022- रविवार (साप्ताहिक सुट्टी)
6 सप्टेंबर 2022- विश्वकर्मा पूजा (रांचीमध्ये बँका बंद)
7 सप्टेंबर 2022- पहिला ओणम (कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद)
8 सप्टेंबर 2022- थिरुओनम (कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद)
9 सप्टेंबर 2022- इंद्रजात्रा (गंगटोकमध्ये बँक बंद)
10 सप्टेंबर 2022- शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
11 सप्टेंबर 2022- रविवार (साप्ताहिक सुट्टी)
18 सप्टेंबर 2022- रविवार (साप्ताहिक सुट्टी)
21 सप्टेंबर 2022- श्री नारायण गुरु समाधी दिन (कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद)
24 सप्टेंबर 2022- शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
25 सप्टेंबर 2022- रविवार (साप्ताहिक सुट्टी)
26 सप्टेंबर 2022- नवरात्री स्थापना (इंफाळ आणि जयपूरमधील बँका बंद)
सणासुदीच्या महिन्यात बँकांच्या शाखा बंद असल्या तरी या काळात तुम्ही तुमचे बँकिंग संबंधित काम ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करू शकता. ऑनलाइन बँकिंग सेवा 24 तास उपलब्ध असेल.