मुंबई: कोरोना काळात कुणाला नोकरी गेल्याचा तर कोणाचे पगार कापल्याचा तर कोणाला महागाईचा फटका बसला आहे. वाढते इंधनाचे आणि भाज्यांच्या दरामुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडत आहे. तर आता दुसरीकडे एटीएम पैसे काढणाऱ्या लोकांनाही मोठा दणका बसणार आहे. आता आपलेच पैसे एटीएममधून काढणं अधिक महाग होणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकेनं ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक पैसे एटीएममधून काढल्यानंतर बँका शुल्क आकारणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना एटीएमवर प्रत्येक व्यवहरावरील शुल्कात 21 रुपये करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता एटीएम वापरताना जपून वापरावं लागणार आहे. 


हे सुधारीत दर 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत. ग्राहक बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला पाच वेळा विनामूल्य़ व्यवहार करू शकतात. त्य़ानंतरच्या प्रत्येक व्यवहाराला शुल्क आकारलं जाणार आहे. तर RBIने डेबिट-क्रेडिट कार्ड्सद्वारे पेमेंट प्रकिया करणाऱ्यांवरही बँकां अधिक फी घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. 


तुमचं कार्ड कोणतं आहे? त्याबद्दल तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे?


रिझर्व्ह बँकेने नुकतीच मास्टरकार्डवर बंदी घातली आहे. यानंतर हे कार्ड चर्चेचा विषय बनला आहे. मास्टरकार्ड आणि व्हिसा हे दोघेही भारतातील पेमेंटसाठीचे सर्वात मोठे स्त्रोत मानले जातात. जेव्हा जेव्हा एखादा ग्राहक हे कार्ड वापरतो, तेव्हा त्याची संपूर्ण माहिती त्या कंपनीच्या सर्व्हरवर जाते. या कंपन्यांचे सर्व्हर परदेशात आहेत. जिथे माहितीची प्रक्रिया आणि वेरिफिकेशन केले जाते. ज्या बँका या कार्डच्या सेवा वापरतात त्या प्रत्येक 3 महिन्यानंतर फी भरतात.


BankBazaarचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, कार्डवरील प्रत्येक व्यवहारासाठी एक इंटरचेंज फी आकारली जाते. व्यवहारासाठी ही रक्कम फारच कमी आहे.