FD Rules Changed: पैशांची बचत करताना अनेक जण आपली रक्कम फिक्स्ड डिपॉझिट करतात. कारण आपली मुद्दल ठराविक वर्षांसाठी तशीच राहते आणि व्याजाचे रुपाने परतावा मिळतो. मात्र आरबीआयने फिक्स्ड डिपॉझिटच्या नियमात बदल केला आहे. आरबीआयच्या रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयानंतर अनेक सरकारी आणि गैर-सरकारी बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे एफडी करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एफडीच्या मॅच्युरिटीचे नियम बदलले


आरबीआयने फिक्स्ड डिपॉझिटच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे. मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर, जर तुम्ही रकमेवर दावा केला नाही तर तुम्हाला त्यावर कमी व्याज मिळेल. हे व्याज बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाइतके असेल. सध्या, बँका सामान्यतः 5 ते 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीच्या एफडीवर 5% पेक्षा जास्त व्याज देतात. तर बचत खात्यावरील व्याजदर सुमारे 3 ते 4 टक्के आहे. सर्व व्यावसायिक बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमधील ठेवींवर हे नवीन नियम लागू होतील.


जुना नियम काय होता?


यापूर्वी एफडीची मुदत संपली आणि तुम्ही ती काढली नाही किंवा दावा केला नाही, तर बँक तुमची एफडी त्याच कालावधीसाठी वाढवत असे. पण आता तसे होणार नाही.  आता मुदतपूर्तीवर पैसे काढले नाहीत तर एफडीवर व्याज मिळणार नाही. त्यामुळे मॅच्युरिटीनंतर लगेच पैसे काढले तर बरे होईल.