RBI कडून एटीएमच्या नियमांमध्ये बदल, ग्राहकांना मोठा दिलासा
भारतीय रिजर्व्ह बँकेंचा ग्राहकांना मोठा दिलासा.
नवी दिल्ली : भारतीय रिजर्व्ह बँकेने एटीएमशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. एटीएममध्ये पैसे काढतांना अनेकदा वेगवेगळ्या समस्या येतात. बँक मात्र असे ट्रांजेक्शन देखील मोजते. ज्यामुळे तुमचे फ्री ट्रांजेक्शन देखील कमी होतात. पण आता एटीएम नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.
बँक ग्राहकांना मोजकेच फ्री ट्रांजेक्शन दर महिन्याला देते. त्यानंतर ग्राहकांना प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी चार्ज लावला जातो. फ्री ट्रांजेक्शननंतर ग्राहकांना ग्राहकांना पैसे निघाले नाही तरी त्याचा चार्ज लागतो. ग्राहकांच्या तक्रारीनंतर आरबीआयने आता नियमांमध्ये बदल करण्याचं ठरवलं आहे. बँकेकडून 5 ते 8 फ्री एटीएम ट्रांजेक्शन दिले जातात.
स्टेट बँक ऑफ इंडिया सेविंग अकाउंटवर 8 फ्री ट्रांजेक्शन देते. एसबीआई 5 फ्री ट्रांजेक्शन एसबीआय एटीएम आणि तीन इतर बँकांच्या एटीएमवर दिले जातात. छोट्या शहरात 10 फ्री ट्रांजेक्शन दिले जातात.
आरबीआयने बदलले नियम
- आता बँक नॉन कॅश ट्रांजेक्शन, जसे बँकेतील रक्कम पाहणे, चेक बुक अप्लाय, टॅक्स पेमेंट किंवा फंड ट्रांसफरला एटीएम ट्रांजेक्शनच्या कक्षेतून बाहेर केलं आहे. म्हणजे आता हे फ्री ट्रांजेक्शनमध्ये नाही मोजलं जाणार. बँक फेल ट्रांजेक्शन देखील एटीएम ट्रांजेक्शन म्हणून नाही मोजलं जाणार.
- पिन वॅलिडेशनमुळे एटीएम ट्रांजेक्शन फेल झाले तर ते देखील यामध्ये मोजलं नाही जाणार.
- आरबीआयने म्हटलं की, बँक फेल ट्रांजेक्शनवर आता कोणताच चार्ज नाही घेतला जाणार.