Home Loanचा EMI कमी होईल की नाही? आज RBI पतधोरणाबाबत काय निर्णय घेणार
RBI Credit Policy Today: तुम्हाला गृहकर्ज ईएमआयमध्ये (EMI) सवलत मिळेल की नाही, याचा निर्णय आज घेण्यात येईल.
मुंबई : RBI Credit Policy Today: तुम्हाला गृहकर्ज ईएमआयमध्ये (EMI) सवलत मिळेल की नाही, याचा निर्णय आज घेण्यात येईल. आज रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास क्रेडिट पॉलिसी सादर करतील. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने पहिल्या 5 वेळा व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. व्याजदराबाबत चलनविषयक धोरण समितीची बैठक 2 जूनपासून सुरु झाली.
आरबीआयचे पतधोरण आज
चलनविषयक धोरण समिती आज व्याज दरावर काय निर्णय घेईल, याकडे लक्ष लागले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वाढती महागाई आणि कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता रिझर्व्ह बँक सध्याच्या स्तरावर बेंचमार्क व्याज दर आहे तसेच ठेवेल. यापूर्वी एप्रिलमध्ये झालेल्या एमपीसीच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने व्याजदरामध्ये कोणतेही बदल केले नाहीत. रेपो दर 4 टक्के, रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के कायम ठेवण्यात आला.
बँक पॉलिसीपूर्वी तज्ज्ञांचे मत
आयसीआरएच्या (ICRA) मुख्य अर्थशास्त्रज्ञ अदिती नायर म्हणतात की, सध्याची कोरोना साथीची परिस्थिती लक्षात घेता आर्थिक दृष्टीकोन अनिश्चित आहे, लसीकरणात वाढ होत नाही तोपर्यंत आम्ही आर्थिक धोरण 2021 च्या मोठ्या भागासाठी सकारात्मक राहील अशी अपेक्षा करतो. आमचा अंदाज आहे की 2021-22 या आर्थिक वर्षात किरकोळ चलनवाढीचा दर अंदाजे 5.2 टक्के असेल जो आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 6.2 टक्के होता.
Moneyboxx Finance Finance Controller विरल शेठ म्हणतात की, आर्थिक धोरणात पॉलिसीचे दर समान राहतील, असा अंदाज आहे. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये पतपुरवठा वाढविणे, त्यासाठी खास खिडकी तयार करणे आरबीआयला आवश्यक आहे आणि लहान एनबीएफसी यात खूप मदत करतील, असे त्यांनी म्हटले आहे.
इंडियन बँकेचे (Indian Bank) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पद्मजा चंदुरू म्हणाल्या की, एमपीसी महागाईवर बारीक लक्ष ठेवून आहे. हे पाहिले गेले आहे की अद्याप अर्थव्यवस्था खुली नाही आणि लसीबाबत अजूनही अनिश्चितता आहे. म्हणून मला वाटते व्याज दर आहे तसेच राहील.
नरेडकोचे (NAREDCO) राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांचे म्हणणे आहे की रिझर्व्ह बँक आपला अनुकूल भूमिका कायम ठेवेल. ते म्हणतात की कोरोनाच्या दुसर्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे, आता यंत्रणेतील तरलता वाढविणे आवश्यक आहे, विशेषत: अडचणीत असलेल्या उद्योगांसाठी.
Andromeda आणि Apnapaisaचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. स्वामीनाथन यांचे म्हणणे आहे की, चलनवाढ ही आगामी आर्थिक धोरणाची मोठी चिंता आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर 100 रुपये आहेत, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे. मला आशा आहे की कोरोनामुळे त्रस्त असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी रिझर्व्ह बँक काही घोषणा करेल.
सलग सहाव्या वेळी दर बदलणार नाहीत!
जर आजही रिझर्व्ह बँकेने व्याजदरामध्ये कोणतेही बदल केले नाहीत तर आरबीआयने सलग सहाव्या वेळेस व्याजदर कायम ठेवले आहेत. गेल्या वर्षी 22 मे रोजी रिझर्व्ह बँकेने व्याजदरामध्ये ऐतिहासिक कपात केली होती. आरबीआयने मार्च 2020 पासून रेपो दरात 115 बेस पॉईंट म्हणजेच 1.12 टक्के कपात केली आहे.