नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल आज चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा पाचवा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहेत.


व्याजाचे दर कमी होणार ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आढाव्यात व्याजाचे दर कमी होण्याची शक्यता धुसर मानली जाते आहे. पण येत्या काळात महागाईचं सावट परतण्याची भीती व्यक्त होत आहेत. त्यामुळे व्याजाच्या दरांविषयी रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती नेमका काय अंदाज वर्तवते याकडे अर्थिक जगताचं लक्ष लागून रहिलं आहे.


अर्थजगताचं लागलं लक्ष 


देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासदराला जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे खीळ बसली. पण पहिल्या तीन महिन्यातनंतर विकासदरानं पुन्हा एकदा वेग पकडला आहे. हा वेग कायम ठेवण्यासाठी व्याजाचे दर आटोक्यात राहणे गरजे आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचा भविष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नेमका काय आहे याकडे अर्थजगताचं लक्ष लागलं आहे.