RBI MPC Policy 2022​ : अन्नधान्यांच्या किमती कमी झाल्यामुळे आता रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (reserve bank of india) व्याजदर वाढ कमी करण्याच्या विचारात आहे असं तज्ञांचे म्हणणे होते. नुकत्याच झालेल्या आरबीआयच्या पतधोरणाच्या बैठकीचे (monetary policy committee meeting MPC) मुद्दे जनतेला सांगताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Repo Rate Hike by 35 bps) यांनी रेपो रेटमध्ये 35 बीपीएसची वाढ सांगितली आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सुरू होती. त्यांच्या या मीटिंगचा एजेंडा हा महागाई (inflation control) रोखण्याचाच होता. त्यामुळे यासाठी आरबीआयकडून कठोर पाऊलं उचलली जातील असे संकेत शक्तिकांत दास यांनी दिले होते. या वर्षीच्या जानेवारीपासून महागाईचा दर 6 टक्क्यांहून अधिक आहे. हा दर समाधानकारक पातळीच्याही वर आहे. त्यामुळे हा दर कमी करण्याचा प्रयत्न आरबीआयकडून केले जाणार आहेत. सध्या व्याजदर 35 बीपीएस (bps) म्हणजे 0.35 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज खरा ठरला आहे. आरबीआयच्या पतधोरणाची बैठक 5, 6, 7 डिसेंबर या तारखेला झाली आहे. (RBI Governor Shaktikanta Das announces 35 bps hike in repo rate RBI raises repo rate by 35 basis points to 6.25 percentage) 


2022 चा आढावा - महागाई आणि शेअर मार्केट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्षी जागतिक आर्थिक पातळीवर (economic crisis) अनेक बदल झालेले पाहायला मिळाले. जागतिक बाजारपेठेत अद्यापही अस्थिरता आहे. त्याचबरोबर मागच्यावर्षीपासून सुरू झालेल्या रशिया आणि युक्रेन युद्धाचाही जगाला आर्थिक परिणाम भोगावा लागला आहे. शक्तिकांत दास यांनी सांगितले की, जगात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा तुटवडा पाहायला मिळाला ज्याचा परिणाम गरीब आणि आर्थिक परिस्थिती दुर्बल असणाऱ्या घटकांना बसला आहे. त्याचबरोबर शेअर मार्केटवरही (share market) या सर्वांचा परिणाम झाला असून कमोडिटी प्राईसवरही या चढ-उताराचा मोठा परिणाम झाला आहे. महागाईचा मोठ्या प्रमाणावर सगळ्यांनाच त्रास भोगावा लागणार आहे अद्यापही महागाईही कमी झालेली नाही आणि ती उच्च स्तरावर आहे. आत्तापर्यंत आर्थिक गणितंही फिस्कली आहेत त्यातून हवामान बदलाचाही परिणाम मोठा असल्याचे सांगत त्यांनी अनेक परिणामकारक मुद्द्यावर लक्ष दिले. 


GDP किती? 


आरबीआयच्या रेपो रेट वाढीबद्दल सांगताना शक्तिकांत दास यांनी भारताच्या जीडीपीबद्दलही माहिती दिली. 7 टक्क्यांवरून भारताचा जीडीपी 6.8 पर्यंत खाली उतरण्याची शक्यता आहे. या परिस्थितीही भारतीय अर्थव्यवस्था ही चांगल्या पातळीवर असल्याचे सकारात्मक संकेतही त्यांनी दिले. यावर्षीच्या ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात जीडीपी हा 4.4 टक्के होता. त्यानंतर तो 4.2 टक्क्यांनी घसरला होता. 2023 च्या वर्षात हाच दर 6.8 पर्यंत वाढले अशी शक्यताही वर्तवली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर बोलताना ते म्हणाले की, ग्राहकांचा आत्मविश्वासही आता हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे उत्पादन आणि सेवा क्षेत्र या काळात सर्वाधिक वाढले असल्याची माहितीही त्यांनी दिली.