आताची सर्वात मोठी बातमी| RBI कडून रेपो रेटमध्ये बदल
सर्वसामान्य नागरिकांना मोठा धक्का, कर्ज महागणार, पाहा काय म्हणाले शक्तीकांत दास
मुंबई : आताची सर्वात मोठी बातमी येत आहे. तुम्ही जर लोन घेतलं असेल तर तुमच्यासाठी हा निर्णय मोठा धक्का देणारा आहे. आरबीआयकडून रेपो रेट वाढवण्यात आले आहेत. याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती शक्तीकांत दास यांनी दिली.
महागाईला अटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.40 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर 4.40 टक्के रेपो रेट झाला आहे. यामुळे सगळ्या प्रकारची कर्ज महाग होणार आहेत. शक्तीकांत दास यांनी माहिती दिली.
एकीकडे महागाईने कहर केला आहे. दुसरीकडे आता कर्जावरील दर वाढणार असल्याने सर्वांना मोठा धक्का आहे. मार्च महिन्यात किरकोळ महागाईचा दर 6.95 टक्के वाढला होता. मागच्या 17 महिन्यात हा दर उच्चांकी असल्याचं दास यांनी सांगितलं आहे. इंधन दरवाढीपाठोपाठ आता स्वयंपाक घरातील वस्तूंचे दरही वाढले आहेत. फेब्रुवारी महिन्यात 13.11 टक्के होता.