मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास आज पुन्हा एकदा सोशल मीडियावरुन १० वाजता संबोधित करणार आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून शक्तीकांता दास तिसऱ्यांदा देशासमोर येत आहेत. आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने कोरोनाच्या काळात सुमारे आठ लाख कोटींचे खेळते भांडवल टप्प्याटप्प्याने बाजारात आणण्याचे जाहीर केले आहे. लॉकडाऊन हळहळू शिथिल होत असताना आज शक्तीकांता दास आणखी कोणत्या नव्या घोषणा करणार याकडे सर्वाचे लक्ष असणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी पहिले लॉकडाऊन जाहीर झाल्यावर रिझर्व्ह बँकेनं पतधोरण समितीची तातडीची बैठक बोलावून व्याजाच्या दरात .७५ टक्के कपात जाहीर केली होती.  त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या कर्जाचे हप्ते तीन महिन्यांकरता स्थगित करण्याची परवानगी सर्व बँका आणि वित्तीय संस्थांना देण्यात आली होती. आजच्या भाषणात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नेमक्या काय काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची देशातील लॉकडाऊन शिथील करण्याबाबत काही निर्णय घेतले आहेत. तसेच आर्थिक पॅकेजही जाहीर करण्यात आले आहे. आता शक्तीकांता दास नेमक्या काय काय घोषणा करतात  याचीही उत्सुकता असणार आहे.