नवी दिल्ली : RBI hit Inflation will rise further : बातमी महागाईत भर टाकणार आहे. त्यामुळे सामान्य लोकांना महागाईचा झटका अधिक बसणार आहे.  बुधवारी आरबीआयने अचानक व्याजदरवाढीचा निर्णय जाहीर केला. त्यातच आता आणखी एका व्याजदरवाढीच्या शक्यतेने बाजारात घबराट पसरली आहे. आता पुढची दरवाढ मोठी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेले अनेक महिने नीच्चांकीवरील (4 टक्के) असणारा रेपो रेट अखेर काल वाढवण्यात आला. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी याबाबतची घोषणा केली. नवीन रेपो रेट हा 0.40 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आधीच बजेट सांभाळताना तारेवरची कसरत करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना EMI वाढीचा झटका बसला आहे. RBI च्या या निर्णयामुळे आता होम लोनपासून ते कार लोन सर्वच महाग होणार आहे.  दरम्यान, आता आणखी एक महागाई वाढीची बातमी हाती आली आहे.


एप्रिल महिन्यातल्या महागाईच्या भडक्याचं कारण या व्याजदरवाढीसाठी देण्यात आलं. आता पुढची दरवाढ तब्बल 0.75 टक्के होण्याची भीती बाजारात व्यक्त होत आहे. खरंच असं झालं तर अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी लागणारं भांडवल महाग होईल. त्यामुळे विकासदराला खिळ बसेल, असे विश्लेषकांचं मत आहे. 


बाजाराच्या दृष्टीने हे चांगले संकेत नाहीत. त्यामुळे आज पुन्हा बाजारात पडझड अपेक्षित आहे. आरबीआयचा पतधोरण आढावा जून महिन्याच्या सुरुवातीला आहे. बुधवारी झालेल्या व्याजदरवाढीमुळे बाजारात तीव्र प्रतिक्रिया उमटली. आता लगेच जून महिन्यात पुन्हा दरवाढ करणं तितकसं संयुक्तिक होणार नाही. पण आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात अशीच मोठी दरवाढ होईल, अशी शक्यता अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.


दरम्यान, आरबीआयच्या कालच्या निर्णयानंतर स्वस्त लोनचा काळ संपल्यात जमा आहे.  RBI च्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांवर EMI बोजा वाढणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडणार आहे. आधीच महागाईचा मार सोसणाऱ्या सर्वसान्य नागरिकांच्या खिशावर आता थेट परिणाम होणार हे स्पष्ट आहे. RBI च्या या निर्णयामुळे आता सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजात वाढ होणार आहे.