तुमचं या बँकेत खातं तर नाही ना! आता 15 हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही
आरबीआयनं आणखी एका बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या बँकेच तुमचं खातं असेल तर पैसे काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
RBI Imposes Restrictions: आरबीआयनं आणखी एका बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या बँकेच तुमचं खातं असेल तर पैसे काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आरबीआयने मुंबईतील रायगड सहकारी बँक लिमिटेडवर निर्बंध लादले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
15 हजार काढण्याची मर्यादा
रायगड सहकारी बँकेच्या ग्राहकांसाठी आरबीआयने 15,000 रुपये काढण्याची मर्यादा लागू केली आहे. त्याचबरोबर सहकारी बँक रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय कर्ज देऊ शकणार नाही. तसेच कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही आणि नवीन ठेवी स्वीकारू शकणार नाही.
बंदी सहा महिने असणार
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकेचे ग्राहक त्यांच्या बचत खात्यातून 15,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाहीत. बँकेवरील हे निर्बंध सहा महिन्यांसाठी लागू असतील. रायगड सहकारी बँकेला दिलेल्या सूचनांचा अर्थ बँकिंग परवाना रद्द करण्याचा नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
दोन मोठ्या बँकांना दंड
आरबीआयने नियमांचे पालन न केल्याबद्दल दोन मोठ्या बँकांवर दंड ठोठावला होता. आरबीआयने दिलेल्या माहितीत, कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँकेने नियमांचं पालन न केल्याबद्दल प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.