RBI Imposes Penalty: देशातील महागाई, बँकांकडून दिलं जाणारं कर्ज, कर्जावरील व्याज, विविध आर्थिक धोरणं या आणि अशा गोष्टींवर लक्ष ठेवून असणाऱ्या आयरबीआय (RBI) अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आता कठोर पवित्रा स्वीकारल्याचं पाहायला मिळत आहे. या बँकेकडून सातत्यानं काही नियमांची आखणी करत त्यांचं पालन न करणाऱ्या बँकांना धडा शिकवण्याचं काम आरबीआय हाती घेताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच आरबीआयनं एसबीआयला दणका दिला होता. ज्यानंतर आता खासगी क्षेत्रातील आणि अनेक पगारदारांची खाती असणाऱ्या दोन बँकांना आरबीआयनं शिक्षा ठोठावली आहे. उपलब्ध माहितीनुसार रिझर्व्ह बँकेनं आयसीआयसीआय बँकेला  (ICICI Bank) 12.19 कोटी रुपये आणि कोटक महिंद्रा बँकेला 3.95 कोटी रुपयांची पेनल्टी सुनावली आहे. 


हेसुद्धा वाचा : सरकारी कर्मचारी मालामाल; Diwali Bonus म्हणून खात्यात येणार मोठी रक्कम


आयसीआयसीआय बँकेवर लोन आणि अॅडवान्सशी संबंधित नियम आणि फ्रॉड क्‍लासीफ‍िकेशन आणि इतर बँकांकडून माहिती देण्यासंबंधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. तर, वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमधील त्रुटी आणि नियमांचं पालन कन करण्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही बँकांकडून नियमांचं पालन करण्यामध्ये अनेक अडचणी दिसून आल्या कारणानं आरबीआयनं कारवाईचा निर्णय घेतला. 


आरबीआयच्या कारवाईचा खातेधारकांवर परिणाम 


केंद्रीय बँकेकडून मागील महिन्यामध्ये साधारण 20 सहकारी, खासही आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधित दंडाची रक्कम आयसीआयसीआय बँकेला ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, बँकेच्या या कारवाईचा खातेधारकांवर थेट परिणाम होणार नसून त्यांच्यासाठी बँकिंग सुविधा सुरळीत सुरु राहतील हे स्पष्ट करण्यात येत आहे. 


काही दिवसांपूर्वीच आरबीआयनं घेतलेला मोठा निर्णय 


RBI नं बँकांवर कारवाई करण्यासोबतच एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. जिथं 1 डिसेंबरपासून प्रॉपर्टीशी संबंधित एक नवा नियम लागू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. या नियमानुसार तुम्ही प्रॉपर्टीवर कोणत्याही प्रकारचं कर्ज घेतलं असल्यास ते पूर्ण फेडण्यासाठी 30 दिवसांच्या आत संबंधित कागदपत्र ग्राहकांना परत द्यावी लागणार आहेत. बँकांकडून ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास दर दिवशी त्यांना 5000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.