RBI कडून मोठी अपडेट; आता `या` 5 बॅंकामधून तुम्ही काढू शकणार नाही पैसा?
Reserve Bank of India Update :RBI नं काही बॅंकांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे तुमचेही जर का या बॅंकेत खाते (Bank Account) असेल तर तुम्हाला लक्ष देणे म्हत्त्वाचे आहे. चला तर पाहूया या लिस्टमध्ये कोणत्या बॅंका आहेत?
Reserve Bank of India: सध्या आरबीआयनं रेपो रेटच्या दरात वाढ केली असल्यानं बॅंकांनीही आपले कर्ज (RBI Repo Rate) वाढवायला सुरूवात केली आहे. त्यातून आता संपुर्ण देश हा महागाईचे संकट पेलत असल्यानं रेपो रेटच्या दराची वारंवार उजळणी आरबीआयकडून होताना दिसते आहे. यंदाच्या रेपो रेटमध्ये केलेली वाढ पाहता महागाई(Inflation) हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे तर काहींनी ही वाढ वारंवार खटकली आहे. या फेब्रुवारी महिन्यात आरबीआयनं (Bank Account) चक्क सहाव्यांदा वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांपुढे आता जास्त ईएमआय भरण्याचा बोजा आहे. त्यातून आता आरबीआयकडून एक मोठी अपडेटही येते आहे. (RBI imposes restrictions on five co-operative banks customer cannot withdrawl money)
आरबीआयनं एक मोठा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे. जर तुमचे या काही बँकांमध्ये अकांऊट (Bank Account Limitation By RBI) असेल तर तुम्ही वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे कारण आरबीआयनं या काही पाच बॅंकांवर निर्बंध आणले आहेत. या बॅंकातून तुम्ही आता पैसे काढू शकत नाही. तुम्ही म्हणाल की असं एकदम काय झालं की या बॅंकामधून पैसे काढणं मुश्किल झाले आहे? तर यामागचे कारणही तुम्ही जाणू घेणे आवश्यक आहे. आरबीआयनं या बॅंकावर प्रतिबंध घातले आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे या बॅंकांची आर्थिक परिस्थिती पाहता या बॅंकांवर हे प्रतिबंध घातले असल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या बॅंकांकडे लोन देण्याचेही काहीही अधिकार नाहीत. त्याचसोबतच यासाठी कोणी अप्लायही करू शकत नाही. या बॅंकांकडून तुम्ही लोन तर घेऊ शकत नाहीतच पण त्याचसोबत पैसे डेबिट किंवा क्रेडिटही करू शकत नाहीत. थोडक्यात तुम्ही या बॅंकांमधून ट्रान्सझॅक्शन (Transactions) करू शकत नाही.
ग्राहकांसाठी सूचना -
या बॅंकामधून खातेधारक 6 महिन्यांपर्यंत तरी कोणत्याही प्रकारचे ट्रांझेक्शन करू शकत नाहीत. जोपर्यंत RBI च्या पुढील सुचना येत नाहीत. तोपर्यंत आरबीआयच्या सूचनांचे पालन या बॅंकांना करावे लागणार आहे. त्याचसोबत या बॅंकांमधील विमा आणि क्रेडिट गॅरंटी निगममधून खातेधारकांना 5 लाखांपर्यंतचा निधी मिळू शकतो.
कोणकोणत्या बॅंका आहेत यादीत?
एचसीबीएल सहकारी बॅंक, लखनऊ, उत्तर प्रदेश (HCBL Co-operative Bank)
आदर्श महिला नगरी सहकारी बॅंक, औंरगाबाद, महाराष्ट्र (Adarsh Mahila Nagari Sahakari Bank)
शिमशा सहकार बॅंक नियमित, मद्दूर, मांड्या, कर्नाटक (Shimsha Sahakari Bank Niyamit)
उर्वाकोंडा सहकारी नगर बॅंक (UrvaKonda Sahakari Nagar Bank), उर्वाकोंडा, अनंतपुर जिल्हा, आंध्र प्रदेश आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बॅंक (Shankarrao Mohite Patil Sahakari Bank), अकलुज, महाराष्ट्र या बॅंकामधील खातेधारक 5000 रूपयांपर्यंतच ट्रांजेक्शन करू शकतात.