COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : आरबीआयनं सर्वसामान्यांना झटका देणारा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय आरबीआयनं घेतला आहे. रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी वाढून ६.२५ टक्क्यांवर नेण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो रेटमध्येही आरबीआयनं वाढ केली आहे. आरबीआयच्या या निर्णयानं दीर्घकालीन व्याजदर महागण्याची शक्यता आहे. आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यामुळे सर्वसामान्यांचा ईएमआयही वाढणार आहे. आरबीआयच्या पतधोरणात ४.८ टक्के ते ४.९ टक्के महागाईचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


म्हणून रेपो रेटमध्ये वाढ


कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे महागाई वाढत होती. तसंच डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमजोर होत होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कमॉडिटीजच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे आरबीआयनं हा निर्णय घेतला आहे. भविष्यात महागाई कमी झाली तर पुन्हा एकदा व्याजदरांमध्ये कपात होईल.


सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल?


५० लाखांचं कर्ज २० वर्षांसाठी घेतलं असेल आणि व्याजदर ९ टक्के असेल तर त्याचा ईएमआय २२,८९७ रुपये एवढा होतो. पण आता बँकांनी पाव टक्क्यांनी व्याजदर वाढवले तर ईएमआय महिन्याला ४०५ रुपयांनी म्हणजेच वर्षाला ५ हजार रुपयांपर्यंत तुमचं व्याज वाढेल.