पुढच्या आठवड्यात RBI आणि MPC ची एक अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी येत्या आठवड्यात RBI आणखी काही महत्त्वाची पावलं उचलू शकतं. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. यामुळे तुमचा EMI पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. 


0.40% वाढू शकतो रेपो रेट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Monetary Policy Committee (MPC) चलनविषयक धोरण समिती ची बैठक ६ ते ९ जून दरम्यान होणार आहे. मागील वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीत MPC ने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट मध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. मात्र मे महिन्यात MPC ने आपत्कालीन बैठक बोलावून व्याज दरांमध्ये  0.40% वाढ केलेली पाहायला मिळाली. PTI या वृत्तसंस्थेने बोफा या सिक्युरिटी एजन्सीच्या हवाल्याने यावेळीही RBI रेपो दरांमध्ये 0.40% ची वाढ करू शकते अशी माहिती दिली आहे. 


टोमॅटोने वाढवली महागाई 


टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे मे महिन्यात महागाई वाढल्याचं पाहायला मिळालं. यामुळे मुख्य महागाई दर हा 7.1% वर पोहोचला आहे. अशात RBI कडून व्याजात वाढ होणार हे जवळजवळ निश्चित आहे, असं बोफा सेक्युरिटीजचं म्हणणं आहे. सरकारकडून पेट्रोल डिझेलवरील करांमध्ये कपात, कच्चं तेल, सनफ्लॉवर तेलाच आयात शुल्क मुक्त करणं, विमानाच्या इंधनांच्या किमती कमी करण्यासारखे अनेक उपाय या आधीच केलेले आहेत. 


येत्या काळात आणखी महाग होणार कर्ज?


PTI ने दिलेल्या माहितीत आरबीआय ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात व्याजदर पुन्हा एकदा 0.35% ते 0.50% वाढू शकतो. या रिपोर्टमध्ये महागाईही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


RBI MPC meet 0.40 percent repo rate may hike emi might become costlier