RBI Recruitment 2020: RBIमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज
रिक्त पदांसाठी 3 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) नोकरीची चांगली संधी आहे. आरबीआयकडून अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. Reserve Bank of Indiaने डेटा एनालिस्ट, अकाऊंट स्पेशालिस्टसह इतर अन्य पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. या पदांसाठी 3 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
RBI Recruitment 2020 अंतर्गत, डेटा एनालिस्ट, अकाऊंट स्पेशालिस्टसह एकूण 39 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक योग्यता -
RBI Recruitment साठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेग-वेगळी आहे. सीए, बीटेक, बीई आणि एमटेकचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार ऑफिशियल नोटिफिकेशन चेक करु शकतात.
वयोमर्यादा -
रिझर्व्ह बॅंकेच्या विविध पदांवर, या रिक्त पदाची वयोमर्यादादेखील वेग-वेगळी ठरवण्यात आली आहे. ज्यात पदांनुसार, कमीत-कमी 25 वर्ष ते अधिकाधिक 40 वर्षांपर्यंत वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे.
3 ऑगस्ट 2020 पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2020 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. इच्छुक उमेदवार RBIच्या ऑफिशियल वेबसाईट rbi.org.in वर ऑनलाईन अर्ज पाठवू शकतात.
आरबीआयच्या या पदांसाठी उमेदवाराची निवड मुलाखत आणि शॉर्टलिस्टच्या आधारे होणार आहे. आयबीआयच्या वेबसाईटवरुन उमेदवार अधिक माहिती घेऊ शकतात.