नवी दिल्ली :कोरोनामुळे देशावर उद्भवलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आरबीयकडून एक पाऊल पुढे पाहायला मिळत आहे. आरबीआयने आपल्या रेपो रेटमध्ये ०.७५ टक्के कपात केल्याची माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. कोरोनामुळे जीडीपीवर परिणाम होणार असल्याचे ते म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरबीआयने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतलाय. रेपो रेटमध्ये ०.७५ टक्क्यांची कपात केल्याची घोषणा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलीय.


त्यामुळे रेपो रेट ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आलाय. तर रिव्हर्स रेपो रेटमध्ये ०.९० टक्क्यांची कपात केलीय.


यामुळे रिव्हर्स रेपो रेट ४.९० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आलाय. याव्यतिरिक्त अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणाही शक्तिकांत दास यांनी केली.


रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणारेय.


कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्लाही बँकांना शक्तिकांता दास यांनी दिलाय.



अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजात घट होणार आहे. कर्जावरी व्याजदर ५.१५ % वरुन कमी करण्यात आला आहे. रिझर्व्ह रेपो रेटमध्ये देखील ०.९० % कपात करण्यात आली आहे.  यामुळे अन्नधान्य, महागाई कमी होण्यास मदत होणार आहे. कोरोनाचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम होणार असल्याचेही ते म्हणाले.