RBI Imposes Penalty : आरबीआयकडून `या` सरकारी बँकेवर दंडात्मक कारवाई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे.
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने इंडियन ओव्हरसीज बँकेला (IOB) 57.5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तुमचं इंडियन ओव्हरसीज बँकेत खाते असेल तर ही बातमी नक्की वाचा. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीशी संबंधित काही नियम आणि नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. (rbi reserve bank of india imposed heavy fine on indian overseas bank)
बँकेवर नक्की आरोप काय?
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2020 च्या अखेरीस बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात वैधानिक तपासणी आणि अहवालांमध्ये त्रुटी आढळून आल्या. ज्याच्या आधारे हा दंड ठोठावण्यात आला आहे.
इंडियन ओव्हरसीज बँक एटीएम कार्ड क्लोनिंग/स्किमिंगशी संबंधित फसवणुकीबाबत 3 आठवड्यांच्या आत माहिती देण्यात अपयशी ठरली. यानंतर हा कारवाईचा बडगा उचलला, असं आरबीआयने म्हटलं.