Reserve Bank of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या द्वैमासिक पतधोरण बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आली असून, त्यानुसार आता पुढील आर्थिक गणितं निर्धारित केली जाणार आहेत. आरबीयाच्या तीन दिवसीय पतधोरण बैठकीचा बुधवारी अखेरचा दिवस असून, बैठकीनंतर त्यात घेण्यात आलेल्या निर्णयांची अधिकृत घोषणा RBI चे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी केली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सध्यातरी रेपो रेट 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवत त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एमपीसीमधील 6 पैकी 5 सदस्यांनी व्याजदरामध्ये बदल करण्याविरोधात मत नोंदवलं. 


हेसुद्धा वाचा : अवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोर 



आरबीआयकडून घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार आता सामान्यांना किमान दिलासा मिळाला आहे. कारण, गृहकर्जाच्या टक्केवारीतही कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. असं असलं तरीही वाहन आणि तत्सम इतर कर्जांमध्ये मात्र कोणतादी दिलासा मिळाला नसल्याचं स्पष्ट होत आहे. आरबीआयनं याआधी 2023 च्या फेब्रुवारीमध्ये रेपो 6.5 टक्क्यांवर आणला होता तेव्हापासून ही आकडेवारी स्थिर असल्याचं सांगण्यात येतं. 


रेपो रेट म्हणजे काय? 


ज्या दरानं किंवा ज्या टक्केवारीनं आरबीआयकडून इतर बँकांना कर्ज दिलं जातं त्या आकडेवारीला रेपो रेट असं म्हटलं जातं. रेपो रेटमध्ये वाढ झाल्यास आरबीआयकडून बँकांनाच महागड्या दरात कर्ज मिळणार असा त्याचा थेट अर्थ होतो. परिणामी गृह कर्जापासून खासगी कर्जामध्येही व्याजदर वाढत असल्याचं लक्षात येतं.