ISRO PSLV-C37: चांद्रयान मोहिम, मिशन आदित्य एल1 या आणि अशा अनेक मोहिमांमुळं जागतिक स्तरावर इस्रोच्या कामगिरीचं कौतुक झालं. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आजवर अनेक महत्त्वाच्या मोहिमा फत्ते करत या क्षेत्रात मैलाचे दगड प्रस्थापित केले. याच इस्रोच्या एका मोहिमेचं वर्तुळ पूर्ण झाल्याचं आता म्हटलं जात आहे. कारण ठरतंय ते म्हणजे थेट अवकाशातून पृथ्वीवर कोसळलेली एक वस्तू.
15 फेब्रुवारी 2017 मध्ये इस्रोनं सतीश धवन स्पेस सेटंर इथून पहिल्यांदाच 104 सॅटेलाईट एकाच वेळी लाँच केले होते. यावेळी ही प्रक्रिया PSLV-C37 या रॉकेटच्या माध्यमातून करण्यात आली होती. अवकाशात उपग्रहांना अपेक्षित स्थळी सोडल्यानंतर गे PS4 तिथंच घिरट्या घालत होतं.
USSPACECOM रॉकेटच्या या भागाला ट्रॅक करत होतं. इस्रोच्याच माहितीनुसार रॉकेटचा हा भाग 470 X 474 किमी आकाराच्या एका अंडाकृती दिशेत फिरत असून, हळुहळू गुरूत्वाकर्षणामुळं पृथ्वीच्या दिशेनं खाली खाली येत होता. याचा एक आलेखसुद्धा जारी करण्यात आला. रॉकेटचा हाच भाग अखेर 6 ऑक्टोबर 2024 रोजी जवळपास 7 ते 8 वर्षांनंतर पृथ्वीवर कोसळला. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत हा भाग अटलांटिक महासागरात कोसळला.
इस्रोच्या सेफ अँड सस्टेनेबल स्पेस ऑपरेशन्स मॅनेजमेंटनं सप्टेंबर महिन्यापासून या रॉकेवर नजर ठेवली होती. तो पृथ्वीवर कोसळण्याची वेळ, त्यामुळं होणारं नुकसान आणि इतर गोष्टींपासून बचाव करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. दरम्यान इस्रोच्या PSLV-C37 या मोहिमेमध्ये जवळपास 104 सॅटेलाईट लाँच करण्यात आले होते. याच मोहिमेचा भाग असणारा कार्टोसॅट भारतीय लष्कराच्या मदतील असल्याचंही सांगितलं जातं.

असं म्हणतात की, सर्जिकल आणि एअरस्ट्राईकमध्येही याची मदत घेण्यात आली होती. शिवाय चिनकडून घुसखोरी केली जात असतानाही त्याला चीनवर तैनात ठेवण्यात आलं होतं. कार्टोसॅट प्रणालीतील उपग्रह सहसा कार्टोग्राफी किंवा नकाशे बनवण्याचं काम करतात. पण, त्यांच्या मदतीनं पाळत ठेवणं, हेरगिरी करणं अशीही कामं केली जातात.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.