मुंबई: तुम्ही बँकेत पैसे काढायला जात असाल आणि तुमचं या बँकेतील खात्यात अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आणखीन एका बँकेवर निर्बंध घातले आहेत. या बँकेतील खातेधारकांना पैसे काढण्यावर निर्बंध आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणखी एका सहकारी बँकेवर निर्बंध आणले आहेत. रिझर्व्ह बँकेनं गारह सहकारी बँकेवर (Garha Co-operative Bank Ltd) निर्बंध घातले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार रिझर्व्ह बँकेच्या लेखी मंजुरीशिवाय बँकेचे व्यवस्थापन कोणत्याही प्रकारचे अनुदान देऊ शकत नाही, 


नवीन कर्ज देऊ शकत नाही किंवा कर्जाचे नूतनीकरण देखील करता येणार नाही. याशिवाय खातेधारकांसाठी पैसे काढण्याची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढता येणार नाहीत. 


सोशल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मसाठी सरकारचे कडक नियम


Garha Co-operative बँकेच्या व्यवस्थापनात कोणतीही नवीन गुंतवणूक पुढील आदेश येईलपर्यंत करता येणार नाही. इतकच नाही तर मालमत्ता विक्री आणि हस्तांतरित करण्यावरही RBIने बंदी घातली आहे. 24 फेब्रुवारी 2021 पासून बँकेवरील हे निर्बंध 6 महिन्यांपर्यंत कायम राहतील आणि त्याचा आढावा घेतला जाईल असंही RBIकडून सांगण्यात आलं आहे.


ग्राहक 50,000 रुपये काढू शकतात


Garha Co-operative बँकेची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन RBIकडून ठेवीदारांवर पैसे काढण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. 50,000 रुपयांपर्यंत ठेवीदारांना पैसे काढता येणार आहेत. बँकेचे 99.40 टक्के ठेवीदारांचे पैसे डीआयसीजीसी विमा योजनेंतर्गत पूर्णपणे संरक्षित आहेत.