मुंबई :  RBI RDG Scheme:तुम्हालाही सुरक्षितपणे गुंतवणूक करायची असेल, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 'RBI रिटेल डायरेक्ट' योजनेमध्ये तुम्हाला सुरक्षिततेसह जबरदस्त फायदे मिळतील.


'द आरबीआय रिटेल डायरेक्ट' सुविधा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या योजनेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. हे खाते उघडण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही ते फक्त ऑनलाइन उघडू शकता. RBIने म्हटले आहे की किरकोळ गुंतवणूकदार रिझर्व्ह बँकेकडे रिटेल डायरेक्ट गिल्ट खाते (RDG खाते) उघडू शकतात.


सरकारी रोखे


सरकारी सिक्युरिटीजची सुलभता सुधारण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार या योजनेअंतर्गत सिंगल आणि जॉइंट खाते उघडता येते. परंतु त्यासाठी तुम्हाला पात्रता निकष पूर्ण करावे लागतील.


या खात्यासाठी आवश्यक कागदपत्रे


तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास, तुमच्याकडे बचत बँक खाते, PAN असणे आवश्यक आहे.  त्यानंतर रिटेल डायरेक्ट प्लॅन अंतर्गत नोंदणी, RDG एक वैध ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असावा.


ऑनलाइन पोर्टल


आरबीआयच्‍या या स्‍कीम अंतर्गत, ऑनलाइन पोर्टल नोंदणीकृत युजरला सरकारी सिक्युरिटीजच्‍या इश्यू व्यतिरिक्त NDS-OM वरमध्ये गुंतवणूक करता येईल. म्हणजेच आता तुम्ही घरबसल्या RBI च्या या खास योजनेचा लाभ सहज घेऊ शकता.