नवी दिल्ली : सत्तर वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. सत्तर आणि त्यापेक्षा वय असलेल्या नागरिकांना त्यांच्या बॅंकेंच्या कामासाठी आता बॅंकेत जाण्याची गरज पडणार नाही. त्यांना घरीच सर्व सेवा दिल्या जाणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं काढलेल्या एका परिपत्रकातून सर्व बँकांना ही सूचना करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तर वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकिंगच्या मूलभूत सुविधा घरच्या घरीच उपलब्ध करून देण्याच्या सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांसाठी काढलेल्या एका परिपत्रकात, ज्येष्ठ नागरिकांना खात्यात पैसे भरणे, पैसे काढणे, डिमांड ड्राफ्ट काढणे, नवीन चेकबुकची मागणी आणि चेकबुक घरी मिळणे अशा सुविधा त्यांच्या घरीच उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ ची मुदतही देण्यात आली आहे. 


रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जे बॅंकेत जाऊ शकत नाहीत त्यांच्यांसाठी ही सुविधा अधिक फायद्याची ठरणार आहे. पण आता बॅंका या निर्णयाची अंमलबजावणी कशी करतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. या निर्णयामुळे बॅंक कार्यालयातील गर्दीला आळा बसण्यासही मदत होणार आहे.