मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी आपल्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी बँकेने आपल्या पॉलिसी समीक्षा बैठकीत मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयातून ग्राहकांना आणि विशेष करून कर्जदारांना मोठा लाभ होणार आहे. बँकेतून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना अधिक फायदा व्हावा यासाठी आरबीआयने मोठं पाऊल उचललं आहे. आरबीआयचे गव्हर्नर अर्जित पटेल यांनी सांगितले की, 31 मार्चपर्यंत हा नियम पाळला जाणार आहे. ज्यातून कर्जदारांना मोठा लाभ होईल. 


स्वस्त होणार कर्ज : 


पॉलिसी समीक्षा बैठकीत आरबीआयने सांगितले की, बँकेतून कर्ज घेणाऱ्या कर्ज अधिक स्वस्त दरात कसं मिळेल अशी सिस्टम तयार करण्यात येणार आहे. आरबीआय लवकरच बेस रेटवर मिळणाऱ्या कर्जाला एमसीएलआरशी जोडणार आङेत. ज्यामुळे कर्ज घेणं अधिक फायदेशीर होणार आहे. 


MCLR वर मिळणार कर्ज : 


आरबीआयने बेस दरात कपात केली असली तरीही याचा फायदा लोकांना तात्काळ होत नाही. यासाठी आरबीआयने बेस रेट शिवाय एमसीएलआरवर लोन देण्याची तयारी दर्शवली आहे. बँकांनी 31 मार्चला हा बदल घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे ग्राहकांना 1 एप्रिलपासून याचा लाभ घेता येणार आहे. 


1 एप्रिलपासून EMI कमी होणार : 


आरबीआयचे 1एप्रिलपासून नियम बदलणार असून कर्ज स्वस्त होणार आहे. तिथे तुमचा ईआयएम देखील कमी होणार आहे. एमसीएलआरची सुरूवात 1 एप्रिल 2016 पासून झाली होती. याचा फायदा नवीन कर्ज घेणाऱ्यांना होत होता मात्र जुन्या कर्जदारांना याचा लाभ घेता येत नव्हता. म्हणून आता ही नवी संधी उपलब्ध होणार आहे.