मुंबई : स्वीडिश कंपनीची रक्कम परतवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या चार आठवड्यांची निर्धारित मुदत संपल्यानंतर अनिल अंबानी यांना कारावास होण्याची चिन्हं पाहायला मिळत असतानाच अनिल अंबानी यांना त्यांच्या मोठ्या भावाची म्हणजेच मुकेश अंबानी यांची मदत झाली आहे. मुकेश अंबानी यांनी आरकॉमचे अध्यक्ष असणाऱ्या अनिल अंबानी यांनी घेतलेली ५५० कोटींची रक्कम व्याजासहित एका स्वीडिश दूरसंचारनिर्मिती करणाऱ्या एरिक्सन नामक कंपनीला परत केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुकेश अंबानी यांच्यामुळे अनिल अंबानी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपल्या मोठ्या भावाकडून मिळालेल्या या मदतीबद्दल अनिल यांनी मुकेश अंबानींचे आभारही मानले आहेत. 'या अडचणीच्या प्रसंगात माझी साथ देण्यासाठी माझा मोठा भाऊ मुकेश आणि त्यांची पत्नी नीता यांचे मी मनापासून आभार मानतो', असं ते म्हणाले. या अडचणीच्या वेळी कौटुंबीक मुल्यांची साथ देणं किती महत्त्वाचं असतं हेच त्यांनी दाखवून दिल्याचं म्हणत अनिल अंबानी यांनी मोठ्या भावाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. 'मी आणि माझे कुटुंबीय आता जुने वाद दूर सारून बरेच पुढे आलो आहोत', असं म्हणत मुकेश अंबानींच्या या भूमिकेविषयी त्यांनी सहृदय आभार मानले. 


...तर अनिल अंबानींना झाला असता तुरुंगवास 


आरकॉमकडून याआधी एकूण ५८० कोटी (अधिक व्याज) या रकमेपैकी ११८ कोटींची थकबाककी रक्कम एरिक्सनला देण्यात आली होती. ज्यानंतर उर्वरित रकमेसाठी अनिक अंबानी यांना १९ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती. संबंधित कंपनीला त्यांची रक्कम परत करण्यास अंनिल अंबानी असमर्थ ठरले असते तर, त्यांच्यावर कारागृहात जाण्याची वेळ आली असती. 


कंपनीची थकबाकी रक्कम फेडण्याची मुदत संपण्यापूर्वी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण अर्थात (NCALT)ने भारतीय स्टेट बँकेला २५९ कोटी रुपयांचा आयकर परतावा जारी करण्याचे आदेश देण्यास मनाई केली होती. हे प्रकरण आपल्या कार्यवर्तुळात मोडत नसल्याचं NCALT ने सांगत कंपनी या माध्यमातून एरिक्सनची परतफेड करु इच्छिते असं स्पष्ट केलं होतं.