मुंबई : सगळीकडे आता लग्नाचं सिझन असताना जगातील सर्वात मोठे बिझनेसमन मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिच लग्न होणार आहे. ईशाचं लग्न पीरामल ग्रुपचे मालिक अजय पीरामलचा मुलगा आनंद याच्यासोबत होणार आहे. आताच ईशाच्या लग्नाचं कार्ड समोर आलं आहे. आता या शाही लग्नाच्या डेटसोबत या रॉयल वेडिंगच्या डिटेलची माहिती रिवील झाली आहे. तसेच या लग्नाच्या सुरूवातीला अंबानी कुटुंबियांनी काय केलं याची देखील माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा अंबानीचं लग्न 12 डिसेंबर रोजी होणार आहे. अंबानी आणि पीरामल कुटुंबांनी माहिती दिली आहे की, आम्हाला सांगायला आनंद होतो की ईशा आणि आनंद यांच लग्न 12 डिसेंबर रोजी लग्न होणार आहे. हे लग्न मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या एंटीलिया या घरी संपन्न होणार आहे. या लग्नाला जवळची मंडळी आणि नातेवाईक असणार आहेत. 


लग्नाच्या अगोदर अंबानी आणि पीरामल यांनी फॅमिलीसोबत डिनर उदयपुरमध्ये ठेवलं आहे. डिनर पार्टीसाठी राजस्थान कल्चरला डोक्यात ठेवण्यात आलं आहे. या लग्नाची सुरूवात होण्याअगोदर अंबानी दाम्पत्य आणि कोकिलाबेन सिद्धिविनायक मंदिरात गेले होते. आणि त्यांनी सर्वात प्रथम बाप्पाच्या चरणी आपली पत्रिका अर्पण केलं


अंबानी यांनी सगळ्यात पहिलं कार्ड गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण केलं आहे. आता सगळ्यांच्या नजरा या लग्नाकडे टिकून आहेत. 23 सप्टेंबर रोजी ईशा आणि आनंदचा साखरपुडा इटलीच्या लेक कोमोमध्ये झालं आहे. 3 दिवसाचा हा सोहळा पार पडला होता.