मुंबई : अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळू शकते. तसेच जानेवारीतील कंपन्यांच्या तिमाही निकालांवर गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. या आठवड्यात अनेक बड्या कंपन्यांचे तिमाही निकाल शेअर बाजारावर परिणाम करणार आहेत. हे सर्व निकाल गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे असतात. सध्या सर्वांच्या नजरा आयटी कंपन्यांकडे लागल्या आहेत. या आठवड्यात TCS, Infosys, Wipro, Mindtree आणि HCL-Tech या प्रमुख IT कंपन्या त्यांचे निकाल सादर करतील. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना कमाईची चांगली संधी आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या वाटचालीसाठी उर्वरित घटकांवरही बाजाराची नजर असेल.(Upcoming IT company Results)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजारावर परिणाम करणारे महत्वाचे टिगर्स
कंपन्यांचे तिमाही निकाल आणि CPI-IIP च्या डेटावरून सेन्सेक्स-निफ्टीतील ऍक्शन ठरवली जाईल. 2022 ची सुरुवात शेअर बाजारासाठी खूप चांगली झाली आहे. देशांतर्गत घटकांव्यतिरिक्त, गुंतवणूकदार जागतिक अर्थकारणावरही लक्ष ठेवतील. कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. त्याचा परिणाम अमेरिकेच्या बाजारांवर आधीच दिसून आला आहे.


या कंपन्यांचे तिमाही निकाल येतील
रेलिगेअर ब्रोकिंगचे रिसर्चचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांच्या मते, आयटी क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्या इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, एचसीएल टेक आणि माइंडट्री या आठवड्यात त्यांचे तिमाही निकाल जाहीर करतील. HDFC बँकेचे तिमाही निकालही येणार आहेत. आयआयपी, सीपीआय आणि औद्योगिक वाढीच्या डेटावरही लक्ष ठेवले जाईल. एकूणच, बाजारातील गुंतवणूकदारांना या निकालांकडून खूप अपेक्षा आहेत.


आयटी कंपन्यांच्या निकालामुळे बाजाराची दिशा ठरेल
मिश्रा यांच्या मते, आयटी कंपन्यांचे तिमाही निकाल बाजाराला दिशा देईल. आयटी क्षेत्रातील बड्या कंपन्यांचे निकाल बाजारात उत्साह, तेजी दाखवतील अशी अपेक्षा आहे. 


मिश्रा म्हणाले की, आत्तापर्यंत बाजाराने कोविडचे नवीन स्वरूप असलेल्या ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांकडे दुर्लक्ष केले आहे, परंतु अनेक राज्यांमध्ये लादलेल्या निर्बंधांमुळे बाजाराच्या पुढील हालचालींवर परिणाम होऊ शकतो.


TCS मध्ये गुंतवणूक सल्ला
एचडीएफसी सिक्युरिटीजने टीसीएसच्या शेअर्सवर गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. TCS ची 12 जानेवारी रोजी बोर्डाची बैठक आहे. बोर्डाच्या बैठकीत बायबॅकचाही विचार केला जाऊ शकतो. 


अशा स्थितीत शेअरमध्ये चढ-उतार पाहायला मिळू शकतात. शेअरची सध्याची किंमत ₹ 3890 आहे. ₹ 4350 च्या लक्ष्य किंमतीसाठी गुंतवणूक सल्ला देण्यात आला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, पुढील 1 वर्षात स्टॉकमध्ये 11 ते 12% वाढ होऊ शकते.