Real Estate Sales : देशातील नागरीकांचा गुंतवणूकीकडे (Investment) कल वाढत चालला आहे. त्यामुळे नफा कमवण्यासाठी नागरीक अनेक क्षेत्रात गुंतवणूक करतायत. तसेच गेल्या काही वर्षापासून नागरीक रियल इस्टेट (Real Estate) क्षेत्राकडे देखील वळले आहेत. या क्षेत्रात नागरीक प्रॉपर्टी खरेदी करून मोठी गुंतवणूक करतायत. देशातील काही प्रमुख शहरात नागरीक प्रॉपर्टी खेरदी करतायत. हे शहर कोणते आहेत, हे जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड-19 च्या काळात रिअल इस्टेट (Real Estate) मार्केटमध्ये मंदी आली होती. या काळात वर्क फ्रॉम होम कल्चर आणि ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून लोकांना मोठ्या घराचे महत्त्वही समजले होते. अशा परिस्थितीत साथीच्या आजारानंतर रिअल इस्टेटमध्ये (Real Estate) अचानक तेजी दिसून आली. देशातील 7 शहरांमध्ये नागरीकांनी मालमत्तेत मोठी गुंतवणूक केली आणि घरे आणि फ्लॅट्स खरेदी केले. अशा स्थितीत यंदा निवासी युनिटच्या विक्रीत विक्रमी वाढ नोंदवली जाईल, असा अंदाज आहे.


'या' शहरात प्रॉपर्टी खरेदी


 2014 मध्ये जिथे 3.43 लाख निवासी युनिट्स विकल्या गेल्या होत्या. त्याचवेळी, यावर्षी हा आकडा 3.6 लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज मीडिया रिपोर्टमधून समोर आला आहे. ही आकडेवारी देशातील फक्त सात शहरांची आहे. जिथे लोक मालमत्तेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतायत. यामध्ये दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळुरू, कोलकाता आणि चेन्नई यांचा समावेश आहे. भारतातील निवासी युनिट्सच्या एकूण विक्रीत या सात शहरांचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक असणे अपेक्षित आहे.


अहवाल काय सांगतो? 


भारतातील प्रथम श्रेणी निवासी बाजाराचा डेटा गोळा करण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत 2.73 लाख निवासी युनिट्सची विक्री झाल्याचे मालमत्ता सल्लागार कंपनी अॅनारॉकच्या (Anarock) 2022 अहवालात समोर आले आहे. तसेच नागरीकांनी खरेदी केलेल्या बहुतेक मालमत्ता (Real Estate) मोठ्या आणि ब्रँडेड विकासकांकडून होत्या. हे विकासक ब्रँडेड किंवा श्रेणी A सूचीबद्ध कंपन्या आहेत आणि गेल्या 10 वर्षांपासून किंवा त्याहून अधिक काळ रिअल इस्टेट व्यवसायात आहेत. या विकासकांनी वेळेत प्रकल्प पूर्ण केल्याने लोकांचा त्यांच्यावरील विश्वास वाढला असल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.  


कोरोनानंतर नागरीकांमध्ये गुंतवणूकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरीक अनेक क्षेत्रात गुंतवणूक (Real Estate)  करू लागले आहे. प्रॉपर्टी देखील नागरीकांसाठी गुंतवणूकीचा एक पर्याय म्हणून समोर आला आहे.