नवी दिल्ली : 'थ्री इडियटस्'मध्ये आमिर खानची भूमिका फुंगसुक वांगडूनं ज्या खऱ्याखुऱ्या व्यक्तीकडून प्रेरणा घेतली ते सोनम वांगचूक सध्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लडाखसारख्या दुर्गम भागात युनिव्हर्सिटीत मुलांसाठी उद्योगशील कोर्सेस सुरू करण्यासाठी त्यांना १४ करोड रुपयांची गरज आहे. या युनिव्हर्सिटीत मुलांनी 'स्किल बेस्ड ट्रेनिंग' दिली जाईल. यासाठी जवळपास ८०० करोड रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. परंतु, यात कोर्स सुरू करण्यासाठी १४ करोड रुपयांची गरज आहे. 


यातील सात करोड रुपये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सीएसआर आणि सात करोड रुपये क्राऊड फन्डिंगमधून जोडण्याचं उद्दीष्ट समोर ठेवण्यात आलंय. क्राऊड फन्डिंगद्वारे वांगचुक यांनी ४.६ करोड रुपये जमा केलेत.


लडाख क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात सुधारणा आणि स्थानिक मुलांना इंटरमीडिएटपर्यंत शिक्षण देण्यासाठी वांगचूक यांनी अगोदरच 'सेकमोल' या संस्थेची स्थापना केलीय. आता या भागातील मुलांना प्रयोगशील शिक्षण देत रोजगार मिळवण्यासाठी सक्षम करण्याची त्यांची इच्छा आहे. 


यापूर्वी, 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्यासमोरही वांगचूक यांनी आपल्या या ध्यासाचा उल्लेख केला होता.