नवी दिल्ली : पुलवामातला दहशतवादी हल्ला आणि त्यावर भारतानं पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ उद्धवस्त करण्याची कारवाई केल्यावर आता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये आंततराष्ट्रीय संबंधांच्या पातळीवर युद्ध होणार आहे. परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत गेल्या पाच वर्षात मोदी सरकारनं उचललेल्या पावलांचा आता खरा कस लागणार आहे. भारतानं पुलवामातल्या रक्तपाताचा १० पट रक्तरंजीत बदला बालाकोटमध्ये घेतला आहे. देशभरात वायुसेनेच्या कारवाईचं स्वागत होत असताना आता खऱ्या अर्थानं लढाईला सुरुवात झाली आहे. भारत-पाकिस्तानमध्ये पारंपरिक अर्थानं युद्ध टाळण्यासाठी जागतिक स्तरावर मोठे प्रयत्न आधीच सुरू झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. चीननं भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.


२. ऑस्ट्रेलिया, फ्रान्सनं पाकिस्तानलाच दहशतवादी तळावर कारवाई करण्याचा सल्ला दिलाय


३. अमेरिकनं आधीच पाकिस्तानची आर्थिक रसद बंद केली आहे. तर आता तरी दहशतवादी संघटनांवर कारवाई करा, अशी तंबी अमेरिकेनं पाकिस्तानला दिली आहे.


तिकडे पाकिस्तानाची स्थिती तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी झाली आहे. नुकत्याच सत्तेवर आलेल्या जैश ए मोहम्मदला दूर सारुन इम्रान खानला सत्ता
टिकवणं कठीण होणार आहे. त्यामुळे भारताला उत्तर देण्यासाठी दबाव वाढतो आहे. पण पाकिस्ताननं अशी आगळीक केली, तर आधीच भिकेला लागलेल्या देशाला जगभरातून मिळणारी आर्थिक मदत बंद होण्याची भीती आहे


गेल्या पाच वर्षात मोदी सरकारनं आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत धोरणावर बरीच टीका विरोधी पक्षांनी केली आहे. मोदींचे परदेश दौरे हा तर देशात सर्वाधिक चर्चेचा विषय झाला. आता पाकिस्तान आणि भारतात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या परराष्ट्रनीतीची खरी कसोटी लागणार आहे.