Real Time Train Information System in Indian Railways : अवेळी धावणाऱ्या गाड्यांमुळे त्रासलेल्या प्रवाशांना आता गाड्यांची सर्व माहिती अचूक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय रेल्वेने गाड्यांच्या इंजिनला 'इस्रो'च्या उपग्रहांशी जोडले आहे. त्यामुळे उपग्रहांच्या माध्यमातून गाड्यांचे सर्वप्रकारचे अपडेट मिळण्यास मदत होणार आहे. (Real Time Train Information System in Indian Railways sz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामध्ये संबंधित गाडीच्या येण्याची, जाण्याची वेळ, गाडीचा नेमका ठावठिकाणा समजण्यास मदत होणार आहे.  रेल्वेचा (Indian Railway) हा उपक्रम यशस्वी झाल्यास आगामी काळात देशात एकही ट्रेन उशिराने धावणार नाही आणि प्रवाशांना तिची रिअल टाइम लोकेशन उपलब्ध होईल.


खरे तर भारतीय रेल्वेने इस्रोच्या (isro) मदतीने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ज्याच्या मदतीने देशात धावणाऱ्या प्रत्येक ट्रेनवर रिअल टाइममध्ये (real time) लक्ष ठेवता येईल आणि त्याची माहिती रेल्वेसह प्रवाशांनाही उपलब्ध होईल.


2700 गाड्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान बसवले


रेल्वेच्या म्हणण्यानुसार, या आधुनिक तंत्रज्ञानाअंतर्गत रेल्वेच्या 2700 लोकोमोटिव्हमध्ये रिअल टाइम ट्रेन इन्फॉर्मेशन सिस्टम (RTIS) उपकरणे बसवण्यात आली आहेत. हे साधन दर 30 सेकंदांनी अपडेट देत राहील. याच्या मदतीने गाड्यांमधील स्वयंचलित चार्टिंग आणि प्रवाशांना नवीनतम स्थितीची माहिती मिळेल. सध्या सुमारे 6500 लोकोमोटिव्हमध्ये जीपीएस बसवलेले आहेत. ज्याचे फीड थेट कंट्रोल ऑफिस ऍप्लिकेशनला पाठवले जाते. त्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाच गाड्यांचे लोकेशन तपासता येते. बाकी सर्वसामान्य प्रवाशांना त्याची माहिती मिळू शकत नाही.


ट्रेनच्या प्रत्येक हालचालीची माहिती तुम्हाला मिळेल


ही उणीव दूर करण्यासाठी रिअल टाइम ट्रेन इन्फॉर्मेशन सिस्टम (RTIS) टूल इस्रोच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. यामुळे, स्थानकावरून गाड्यांचे आगमन, प्रस्थान आणि पासिंगची रिअल-टाइम माहिती रेल्वे यंत्रणा आणि प्रवाशांना आपोआप उपलब्ध होईल.


वाचा : 500 रुपयांची 'ही' नोट तुमच्याकडे आहे का? असेल तर तातडीने बॅकेत जा आणि...


प्रवाशांनाही रेल्वेकडून तपासता येणार आहे


रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आरटीआयएस 30 सेकंदांच्या अंतराने अपडेट देते. याद्वारे आता गाड्यांचा वेग आणि स्थान यावर बारकाईने लक्ष ठेवता येणार आहे. मंत्रालयाचे म्हणणे आहे की RTIS उपकरणे 2700 लोकोमोटिव्हमध्ये बसवण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्प्यात, इस्रोच्या SATCOM हबचा वापर करून, या योजनेत आणखी 6000 इंजिनांचा समावेश केला जाईल.