Currency News: 500 रुपयांची 'ही' नोट तुमच्याकडे आहे का? असेल तर तातडीने बँकेत जा आणि...

Currency News Update: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चलनात मोठे बदल करू शकते. तुम्हीही तुमच्या घरात नोटा साठवून ठेवल्या असतील तर लगेच जाणून घ्या आता कोणता बदल होऊ शकतो.  

Updated: Sep 24, 2022, 12:15 PM IST
Currency News: 500 रुपयांची 'ही' नोट तुमच्याकडे आहे का? असेल तर तातडीने बँकेत जा आणि...    title=

Currency News Today : नोटबंदीनंतर देशभरात चलनाबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. आज आम्ही तुम्हाला नोटांशी संबंधित एक मोठी अपडेट सांगणार आहोत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चलनात मोठे बदल करू शकते. तुम्हीही तुमच्या घरात नोटा साठवून ठेवल्या असतील तर लगेच जाणून घ्या आता कोणता बदल होऊ शकतो. (rbi may change currency note in india due to 500 rupees note )

सूचना मागितल्या
देशभरात चलनात येणाऱ्या नोटांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai Highcourt) मोठा खुलासा केला आहे. देशातील दृष्टिहीन (handicap) लोकांसाठी रुपया आणि नाणी अधिक अनुकूल बनवण्याचे मार्ग सुचवण्यास न्यायालयाने तज्ञांना सांगितले आहे. अशा सूचनेनंतरच बॅकेकडून नवीन प्रकारच्या नोटा जारी केल्या जाऊ शकतात.

आधीच केलेले बदल
रिझव्‍‌र्ह बँकेने (RBI) नोटांमधील स्पर्शाशी संबंधित अनेक बदलही केले आहेत. जेणेकरून दृष्टिहीन (handicap news) लोकांना सहज ओळखता येईल आणि रुपया किंवा नाणी यात फरक करता येईल. तज्ज्ञांच्या सूचनेनंतर रुपया किंवा नाणे बदलून दृष्टिहीनांसाठी योग्य बनविण्याचा प्रयत्न केला जातो.

MANI अॅप देखील अपडेट केले
याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही (RBI) अलीकडेच MANI अॅप अपडेट केले आहे. यामध्ये आता 11 भाषांचा समावेश असू शकतो. सुरूवातीला फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेचा समावेश होता. आता हे अॅप उर्दू, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये उपलब्ध असेल. तसेच हे अॅप पूर्णपणे मोफत उपलब्ध असणार आहे. 

वाचा : Moonlighting ला सरकारचा हिरवा कंदील; IT कंपन्यांमध्ये तूफान चर्चा!

2020 मध्ये लाँच केले 
रिझर्व्ह बँकेने 2020 मध्ये हे अॅप लाँच केले. अंध लोकांना नोटा ओळखण्यात येणाऱ्या अडचणी दूर करणे हा त्यामागचा हेतू होता. या अॅपच्या मदतीने कोणतीही व्यक्ती नोट सहज ओळखू शकते. त्याचबरोबर व्यक्तीच्या हातात कोणती नोट आहे हे अॅपच्या माध्यामातून आवाज ऐकू येतो. अशा परिस्थितीत अंध व्यक्तींना त्यांच्याकडे कोणती नोट आहे हे अगदी सहज कळू शकते.