भोपाळ : मध्य प्रदेशात अजूनही बहुमताचा आकडा स्पष्ट होत नाहीय, असं का होत आहे, याविषयी आश्चर्य़ व्यक्त केलं जात आहे. तरी देखील यामागे एक कारण दडलेलं आहे. बहुमताचा आकडा आपल्याबाजूने आल्यानंतर एकदा भाजपाने तर दोन वेळेस काँग्रेसने जल्लोष करू झाला आहे. पण आता नेमका बहुमताचा आकडा कुणाला मिळेल हे स्पष्ट होवू शकत नाहीय. त्यामागे कारणंही तेवढंच महत्वाचं आहे.


हे आहे खरं कारण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशात बहुमताचा आकडा सतत का हेलकावे खातोय हा प्रश्न सुटलाय , कारण मध्य प्रदेशात ३० जागा अशा आहेत, ज्यावर भाजपा आणि काँग्रेसचे उमेदवार ५०० मतांच्या फरकावर आघाडीवर आहेत किंवा पिछाडीवर आहेत, या जागा फारच निर्णायक ठरणार आहेत.


मध्य प्रदेशात आतापर्यंत मतमोजणीत १७ फेऱ्या झाल्या आहेत, साधारण २१ व्या फेरीत सर्व निकाल स्पष्ट होणार आहेत. तेव्हा काँग्रेस आणि भाजपाचा बहुमताचा आकडा असाच खाली वर होताना दिसणार आहे. 


मध्य प्रदेशचा सुरूवातीचा आकडा हा धक्कादायक होता, भाजपापेक्षा काँग्रेस मोठ्या प्रमाणात आघाडीवर होतं. आता पुन्हा भाजपा आणि काँग्रेस बरोबरीला आले आहेत. तरीही बहुमतासाठी किंग मेकर्सची गरज पडेल किंवा नाही हे शेवटच्या अपडेटनंतरचं स्पष्ट होणार आहे. (अपडेट 12.42 दुपारी)


निकाल LIVE पाहा  http://zeenews.india.com/marathi/live​ वर क्लिक करा.