नवी दिल्ली : अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केंद्र सरकारतर्फे २०१७-२०१८ साठी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सोमवारी संसदेत सादर केला. यावेळेस आर्थिक सर्वेक्षण अहवाल गुलाबी रंगात सादर करण्यात आला. यापूर्वी तो पिवळ्या रंगात सादर करण्यात येत होता. मात्र यावेळेस रंगात बदल का करण्यात आला? जाणून घेऊया यामागील कारण...


आर्थिक सर्वे यासाठी समर्पित


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर सरकारने आर्थिक सर्वे हा महिला सशक्तीकरण आणि लैंगिक समानता यासाठी समर्पित केले आहे.


तीन आयामांवर सर्वे तयार


सर्वेनुसार पुर्वोत्तरेकडील राज्यांनी लैंगिक समानतेच्या मुद्द्यावर खूप चांगले काम केले आहे. जे पूर्ण देशासाठी आदर्श ठरू शकते. सर्वेत लैंगिक समानता या मुद्द्याला महत्त्व देण्यात आले आहे. सर्वेत लैंगिक भेदभावाबद्दल बोलण्यात आले आहे. सरकारने तीन आयामांवर तो तयार केला आहे.


पहिला एजेंसी, दुसरा अॅडिट्युड आणि तिसरा आऊटकम.


  • एजेंसीचा अर्थ प्रजनन, परिवारावर खर्च करण्याचा निर्णय घेण्याची क्षमता.

  • अॅडिट्युडचा अर्थ महिलांची हिंसा. 

  • आऊटकम म्हणजे शेवटच्या मुलाच्या जन्माच्या आधारावर मुलगा किंवा मुलीला महत्त्व.

  • याव्यतिरिक्त महिलांचा रोजगार, परिवाराचे नियोजन, शिक्षण, लग्नाचे वय. पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी वय याचा अभ्यास करण्यात आला आहे. 


महिला सशक्तीकरण


सर्वेच्या आकडेवारीत महिला सशक्तीकरणाची पडताळणा करण्यात आली आहे. सर्वेत सांगितले आहे की, रोजगार, परिवाराचे नियोजनाचे उपाय, मुलाला प्राधान्य अशा मुद्द्यांवर खूप काही करण्याची गरज आहे. गेल्या १५ वर्षात महिलांच्या जीवन स्तरात सुधारणेत भारताने महत्त्वपूर्ण काम केले आहे. यात १७ मुद्द्यांपैकी १४ वर चांगले काम करण्यात आले आहे.