मुंबई : काळा चष्मा ही करूणानिधींची ओळख होती. मात्र 1957 पर्यंत करूणानिधी काळा चष्मा घालत नव्हते. एका अपघातामुळे करूणानिधींना काळा चष्मा घालणं गरजेचे झाले होते. 'या' आजारात करूणानिधींचं निधन


करूणानिधींना का घालावा लागला काळा चष्मा ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1960 सालापासून करूणानिधींना काळा चष्मा घालणं आवश्यक बनले होते. एका अपघातामध्ये त्यांच्या डाव्या डोळ्याला जबर धक्का बसला होता. सुरूवातीला काळा चष्मा घालणं अटळ होते मात्र हळूहळू त्यांना चष्म्याची सवय झाली. 


अन जेव्हा करूणानिधींनी चष्मा बदलला...  



सुमारे 50 वर्षाहून अधिक काळापर्यंत करूणानिधींनी काळा चष्मा घातला होता. 2017 साली त्यांनी चष्मा बदलला. नव्या चष्माच्या फ्रेम पूर्वीपेक्षा थोडी हलकी होती. हा नवा चष्मा जर्मनीहून आयात करण्यात आला होता. त्यासाठी 40 दिवस या चष्माच्या फ्रेम शोधण्यात आल्या. त्यानंतर अखेर करूणानिधींसाठी योग्य फ्रेम निवडली गेली. 


एका मीडिया रिपोर्टनुसार करूणानिधींना जूना चष्मा बदलण्यासाठी डॉक्टरांकडून मनधरणी करावी लागली. त्यानंतर  करूणानिधी चष्मा बदलण्यासाठी तयार झाले.