मुंबई : TRAI issues order: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने दूरसंचार कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे. TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना एक नवीन आदेश जारी केला आहे. कंपन्यांना किमान एक प्लान ठेवावा लागेल जो संपूर्ण महिन्यासाठी वैध असेल. त्यासाठी कंपन्यांना 60 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.


60 दिवसांची मुदत देण्यात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेलिकॉम कंपन्यांना किमान एक प्लान, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक स्पेशल रिचार्ज प्लॅन संपूर्ण महिन्यासाठी वैधता असलेला ठेवावा लागेल. याची निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना 60 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. 1 जून 2022 पासून 1 महिन्याची योजना आवश्यक असेल.


महिन्याच्या नावावर 28 दिवसांची वैधता  


बहुतांश टेलिकॉम कंपन्या एका महिन्याच्या रिचार्जच्या नावावर ग्राहकांना 28 दिवसांची वैधता देतात. नुकताच जिओने हा प्लान लॉन्च केला असला तरी, Vodafone- Idea आणि Airtel सारख्या इतर टेलिकॉम कंपन्यांना 60 दिवसांच्या आत नवीन प्लान लाँच करावे लागतील.


ग्राहकांकडून तक्रारी 


ट्रायकडे याबाबत ग्राहकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. ग्राहकांच्या मते, कंपन्या प्लॅन/टॅरिफची वैधता कमी करत आहेत. आणि एका महिन्याऐवजी 28 दिवस देतात. त्यानंतर ट्रायने हा निर्णय घेतला आहे.